शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 05:38 IST

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी दुपारी १२ वाजता ऑनलाइन जाहीर केला. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्के घट झाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के इतका लागला असून सर्वात कमी राहिला आहे.

शाखानिहाय निकाल

विज्ञान८६.४४%कला७८.०२%वाणिज्य८७.०३%व्यवसाय अभ्यासक्रम८२.७४%आयटीआय८३.७८%२६ विषयांचा निकाल १००%

राज्य मंडळाने एकूण १५३ विषयांसाठी परीक्षा घेतली. यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बहुतांश शाखांमध्ये थोडी घसरण झाली असून, कला शाखेचा निकाल तुलनेने कमी राहिला आहे.

यंदाचा निकाल- ८९.७९%गतवर्षीचा निकाल- ९१.८८%घट२.०९%विभागनिहाय निकालकोकण९४.१४%पुणे९१.२५%अमरावती२०.९२%नाशिक९०.७२%मुंबई९०,०८%कोल्हापूर८९.९७%छत्रपती संभाजीनगर८८.६८%नागपूर८८.६७%लातूर८४.१४%उत्तरपत्रिका तपासणीसाठी ३ मे ते १७ मेपर्यंत मुदत बारावीच्या निकालानंतर गुण पडताळणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ३ ते १७ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. निकालानंतर नवी मुंबईतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा असा जल्लोष केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Konkan shines in state; Latur at bottom! 12th result declined.

Web Summary : Maharashtra's 12th result is 89.79%, a 2.09% decrease. Girls outperformed boys by 6.35%. Two students scored 100%. Konkan topped with 94.14%, while Latur scored the lowest at 84.14%. Students can apply online for verification from May 3-17.
टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी