शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 03:21 IST

National Commission for Women On Nasrapur case : "हा जघन्य अपराध तीव्र वेदना आणि संताप निर्माण करणारा असून, मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त होत आहे. तसेच असे गुन्हे मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात," असे आयोगाने म्हटले आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण पूणे हादरले आहे. या पाशवी घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. "हा जघन्य अपराध तीव्र वेदना आणि संताप निर्माण करणारा असून, मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त होत आहे. तसेच असे गुन्हे मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात," असे आयोगाने म्हटले आहे.

"असे गुन्हे समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात" -राष्ट्रीय महिला आयोगाने 'एक्स'वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील पुणे येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या या अत्यंत भीषण घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. हा जघन्य अपराध तीव्र वेदना आणि संताप निर्माण करणारा असून, मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या अमानवीय कृत्याचा तीव्र निषेध करतो. असे गुन्हे मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात." 

हेही वाचा - नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणारमाननीय अध्यक्षांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या प्रकरणाची तात्काळ दखल घेत, तपासावर लक्ष ठेवण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली आहे. 

जलदगती न्यायालयांत वेगाने खटला चालविण्यावर आयोगाचा भार - याच बरोबर, पीडितेच्या कुटुंबाला त्वरित मदत आणि नुकसान भरपाई देणे, पॉक्सो कायद्यांतर्गत कालबद्ध आरोपपत्र दाखल करणे आणि जलदगती न्यायालयांत वेगाने खटला चालवण्यासंदर्भातही आयोगाने भर दिला आहे. तसेच प्रत्येक मुलीची सुरक्षा आणि न्याय सुनिश्चित करणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.हेही वाचा - नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?६५ वर्षीय आरोपीला अटक, ७ मेपर्यंत पोलीस कोठडी -दरम्यान, या प्रकरणात राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. भिमराव कांबळे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला शनिवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाने तपासासाठी अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने कांबळेला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

महत्वाचे म्हणजे, तपासादरम्यान आरोपी काबळे विरोधात यापूर्वीही महिलांच्या लैंगिक छळाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Nasrapur Case: National Women's Commission intervenes, expresses outrage, monitors investigation.

Web Summary : National Women's Commission takes cognizance of Nasrapur rape and murder case, expressing concern over women's safety. They demand strict action, fast-track trial, and compensation for the victim's family. A 65-year-old suspect is arrested with a history of sexual assault.
टॅग्स :National women commissionराष्ट्रीय महिला आयोगPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिस