शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:08 IST

Pune crime - या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. सुटीसाठी आजीकडे आलेल्या चिमुरडीला ‘वासरू दाखवतो’ असे सांगून गोठ्याकडे नेण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप ६५ वर्षीय भिमराव कांबळे याच्यावर आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने तपासासाठी अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपासादरम्यान आरोपीविरोधात यापूर्वीही महिलांच्या लैंगिक छळाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नसरापूर गावात नागरिकांनी कडकडीत बंद पाळत घटनेचा निषेध व्यक्त केला. गावकऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. न्यायालय परिसरातही आंदोलनकर्त्यांनी आरोपीची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. “महिला आणि मुलींवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली.काही संघटनांनी राज्य सरकारने अशा प्रकरणांमध्ये जलदगतीने निर्णय घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Old crimes of female harassment uncovered; accused in custody.

Web Summary : Nasrapur case: A minor girl was brutally assaulted and murdered. The accused, Bhimrao Kamble, is in police custody until May 7th. He has prior records of sexual harassment. Protests demand strict punishment for the perpetrator.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र