1 / 8अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे जगभरात निर्माण झालेल्या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर आगामी काळात घरगुती एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढत असल्याने, येणाऱ्या काळात याचा परिणाम इंधनाच्या दरांवरही होऊ शकतो. 2 / 8माध्यमांतील वृत्तांनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होऊ शकते. असे झाल्यास, ही पेट्रोल-डिझेलच्या दरातील गेल्या चार वर्षांतील पहिलीच मोठी वाढ ठरेल.3 / 8घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता - केवळ इंधनच नव्हे, तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्याही पार गेले आहेत. याचा थेट परिणाम तेल कंपन्यांवर होत असून त्यांच्यावर दरवाढीसाठी मोठा दबाव आहे. 4 / 8महत्वाचे म्हणजे, गेल्या महिन्यात सरकारने कंपन्यांना दिलासा देण्यासाठी करात कपात केली होती, मात्र वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे आणि मागणीमुळे तो दिलासा अपुरा ठरत असल्याचे चित्र आहे.5 / 8पुढील ५ ते ७ दिवसांत घेतला जाऊ शकतो मोठ्या निर्णय - 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, सरकार पुढील ५ ते ७ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, सध्यातरी यासंदर्भात सरकारी पातळीवर कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. अथवा यासंदर्भात कसल्याही प्रकारची अधिकृत घोषणाही झालेली नाही. 6 / 8याशिवाय, कमर्शियल एलपीजी सिलिंडरचा विचार करता, या सिलिंडरच्या किमतीत सलग तिसऱ्या महिन्यात वाढ करण्यात आली आहे. १ मे रोजी झालेल्या दरवाढीमुळे दिल्लीत कमर्शियल सिलिंडरचा दर ३००० रुपयांच्याही पुढे गेला आहे. गेल्या तीन महिन्यांत कमर्शियल गॅसच्या दरात तब्बल ४७ टक्क्यांची वाढ झाली.7 / 8महत्वाचे म्हणजे, नायरा आणि शेल इंडिया यांसारख्या खाजगी कंपन्यांनी आधीच दरवाढ केली आहे. मात्र, सरकारी कंपन्यांनी अद्याप कसल्याही प्रकारची दरवाढ केलेली नाही. अपवाद, प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल वगळता. 8 / 8सध्या दिल्लीत या पेट्रोलचा दर १६० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला असून, येत्या काही दिवसांत सामान्य पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते.