शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 13:30 IST

1 / 6
मॉडेलिंगचे जग बाहेरून जितके चकमकीत आणि ग्लॅमरस दिसते, तितकेच ते आतून काळवंडलेले आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रसिद्ध पत्रकार वाहिद अली खान यांनी दुबईतील मॉडेल एजन्सी आणि भारतीय मॉडेल्सच्या 'लॅविश' लाइफस्टाईलमागचे एक भयानक वास्तव जगासमोर आणले आहे.
2 / 6
वाहिद अली खान यांनी 'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अनेक भारतीय मॉडेल्स ज्यांना एकेकाळी मुंबई ते कलकत्ता प्रवासाचे तिकीट काढणे कठीण होते, त्या अचानक दुबईत जाऊन बिझनेस क्लासने प्रवास करतात, बीएमडब्ल्यू आणि रेंज रोव्हर सारख्या महागड्या गाड्यांतून फिरतात आणि वांद्रे सारख्या उच्चभ्रू भागात ३ ते ५ बीएचके फ्लॅट खरेदी करतात.
3 / 6
शूटच्या नावाखाली फसवणूक: या मॉडेल्स शूटच्या नावाखाली दुबईला जातात, पण प्रत्यक्षात तिथे कोणतेही मोठे प्रोजेक्ट्स नसतात. त्या फक्त ५-६ दिवस तिथे राहून ऐशोआराम करून परत येतात.
4 / 6
दुबई आणि मुंबईतील काही एजन्सी या मुलींना तिथे नेऊन त्यांचे शोषण करतात. त्यांना आलिशान आयुष्याची सवय लावली जाते आणि त्यानंतर त्यांना या चक्रात अडकवले जाते.
5 / 6
क्रिकेट बुकीज आणि कॉल सेंटर चालवणारे लोक या रॅकेटमध्ये सामील असतात. दुबईतील पार्ट्यांमध्ये टेबलवर 'रौनक' आणण्यासाठी या मुलींचा वापर केला जातो, ज्यांना 'कँडी गर्ल्स' म्हटले जाते.
6 / 6
खान यांनी एका मॉडेलचा उल्लेख केला जी कोविडच्या काळात, जेव्हा जग संकटात होते, तेव्हा चार्टर्ड प्लेनने दुबई आणि लंडनला जात होती. अनेक मुली गरिबीमुळे किंवा मजबूरीने या कामात ढकलल्या जातात, तर काहींना या ग्लॅमरस आयुष्याची भुरळ पडते.
टॅग्स :Dubaiदुबई