जयपूर: राजस्थान पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी आणि मानवाधिकार विभागाचे महानिरीक्षक किशन सहाय यांच्यावर एका ५३ वर्षीय महिलेने बलात्कार आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी जयपूरमधील मालवीय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, किशन सहाय यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करण्यात आला. जेव्हा महिलेने या कृत्याला विरोध केला, तेव्हा आयजी सहाय यांनी तिला बेदम मारहाण केली आणि कोणाकडेही तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
टपालाद्वारे पाठवली तक्रारपीडितेने या घटनेची माहिती थेट मालवीय नगर पोलिसांना टपालाद्वारे (पोस्ट) पाठवली. या पत्रातील गंभीर आरोपांची दखल घेत पोलिसांनी तातडीने एफआयआर नोंदवला आहे. सध्या किशन सहाय हे 'ह्युमन राईट्स' (मानवाधिकार) विभागात आयजी पदावर कार्यरत आहेत, त्यामुळे मानवाधिकारांचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यावरच असे आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस विभागाकडून चौकशी सुरूएका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने राजस्थान पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. "आम्ही प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. तथ्यांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल," असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
Web Summary : Rajasthan Police IG Kishan Sahay faces rape allegations by a 53-year-old woman. Accused of rape, assault, and threats at his residence, a case has been filed. Police investigation is underway, causing administrative turmoil.
Web Summary : राजस्थान पुलिस IG किशन सहाय पर 53 वर्षीय महिला ने बलात्कार का आरोप लगाया। आवास पर बलात्कार, मारपीट और धमकी देने के आरोप में मामला दर्ज। पुलिस जांच जारी, प्रशासनिक उथल-पुथल।