Join us
Daily Top 2Weekly Top 5

गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास

वय कमी असल्यामुळे क्रिकेट अकादमीत प्रवेश नाकारला, पण...

By सुशांत जाधव | Updated: May 2, 2026 19:43 IST

Open in App

इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्ड कप जिंकल्यावर छोट्या फॉरमॅटमध्ये पहिला वहिला विश्वचषक जिंकण्यासाठी निवडलेल्या १५ रणरागणींमधील नंदिनी शर्मा हिने सर्वांचे लक्षवेधले आहे. कारण पहिल्यांदाच तिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. एका बाजूला अमनजोत कौर आणि टीम इंडियातील ब्युटी हरलीन देओल यांना टी-२० संघात स्थान मिळाले नसताना ही नंदिनी शर्मा कोण? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!गल्ली क्रिकेट ते टी-२० वर्ल्ड कप व्हाया WPL; कोण आहे नंदिनी शर्मा 

नंदिनी शर्मा ही उजव्या हाताची मध्यम जलदगती गोलंदाज आहे. महिला प्रीमियर लीगच्या गत हंगामात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाकडून खेळताना तिने हॅटट्रिकसह मैफील लुटली होती. एवढेच नाही तर तिने पर्पल कॅपही जिंकली होती. या स्वप्नवत कामगिरीनंतर आता टी-२० वर्ल्ड कपसाठी तिने भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. 

WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास

वय कमी असल्यामुळे अकादमीत प्रवेश नाकारला, पण...

नंदिनी मुळची चंडीगडची आहे. २० सप्टंबर २००१ रोजी जन्मलेल्या नंदिनीचा क्रिकेटचा प्रवास हा गल्ली क्रिकेटमधून सुरु झाला. भावाला पाहून ती क्रिकेटच्या प्रेमात पडली. वयाच्या ८ व्या वर्षी ती व्यावसायिक क्रिकेटचे धडे घेण्यासाठी अकादमीत प्रवेश घेण्यासाठी गेली. पण वय कमी असल्यामुळे तिला प्राथमिकता मिळाली नाही. पण तिने हार न मानता जिद्दीनं क्रिकेटच्या मैदानात आपली प्रतिभा दाखवून दिली. बॅक-ऑफ-द-हँड स्लोअर बॉल ही तिच्या गोलंदाजीतील खासियत आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Street cricket to Team India: Nandini Sharma's T20 World Cup dream.

Web Summary : Nandini Sharma, a medium-fast bowler, earned a spot in India's T20 World Cup squad after a stellar WPL season with Delhi Capitals, including a hat-trick and Purple Cap. Overcoming early academy rejection, she honed her skills with her unique back-of-the-hand slower ball.
टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेटआयसीसी महिला टी२० विश्वचषकहरनमप्रीत कौरबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ