शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:34 IST

Barrier-less tolling system India: नितीन गडकरी यांनी गुजरातमध्ये देशातील पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोलिंग सिस्टिम सुरू केली आहे. आता १२० च्या स्पीडने गाडी चालवली तरी टोल आपोआप कापला जाईल.

भारतीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भारताची पहिली 'मल्टी-लेन फ्री फ्लो' बॅरियर-लेस टोलिंग सिस्टिम लॉन्च केली. गुजरात मधील NH-48 वरील सुरत-भरूच सेक्शनमधील चोर्यासी टोल प्लाझा येथे हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

पारंपारिक टोल नाक्यांवर वाहनांना थांबवण्यासाठी फिजिकल बॅरियर (दांडा) असतात. मात्र, या नवीन प्रणालीत कोणताही अडथळा नसेल. रस्त्याच्या वर एक ओव्हरहेड फ्रेम बसवण्यात आली आहे, जी सेन्सर आणि हाय-टेक एआय कॅमेऱ्यांनी सज्ज आहे.

१२० च्या स्पीडने गाडी गेली तरी टोल कापला जाणार!या सिस्टिमची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे, जर एखादे वाहन १२० किमी प्रतितास वेगाने टोल पॉइंटवरून गेले, तरी देखील त्यावरील एआय कॅमेरे गाडीची नंबर प्लेट अचूक वाचू शकतील. हे तंत्रज्ञान FASTag आणि ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन) यांच्या संगमावर आधारित आहे. गाडी टोल खालून जाताच आरएफआयडी रीडर फास्टॅग स्कॅन करेल आणि खात्यातून पैसे आपोआप वजा होतील.

फास्टॅग नसेल तर काय होणार?ज्या गाड्यांकडे फास्टॅग नसेल किंवा तो काम करत नसेल, अशा वाहनांची ओळख नंबर प्लेटवरून एआय कॅमेराद्वारे पटवली जाईल. त्यानंतर संबंधित वाहन मालकाला थेट ई-नोटीस पाठवली जाईल.

प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचतया अत्याधुनिक प्रणालीमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी पूर्णपणे नष्ट होईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल. वाहनांचे इंधन वाचेल आणि प्रदूषण कमी होईल. टोल नाक्यांवर मानवी हस्तक्षेपाची गरज भासणार नाही. भारताच्या टोलिंग सिस्टिमला जागतिक दर्जावर नेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India's First Barrier-Free Toll Plaza Opens in Surat: Key Details

Web Summary : India's first barrier-free toll system launched in Surat, Gujarat. AI cameras read number plates even at 120 km/h. FASTag automatically deducts toll; otherwise, e-notices are issued. This reduces congestion, saves fuel and time, and minimizes pollution.
टॅग्स :tollplazaटोलनाकाNitin Gadkariनितीन गडकरीFastagफास्टॅग