शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:06 IST

इराणने होर्मुझ स्ट्रेट उघडण्याच्या बदल्यात अमेरिकेला नाकेबंदी हटवण्याचा प्रस्ताव दिला होता, जो ट्रम्प यांनी फेटाळला आहे.

पश्चिम आशियातील तणाव निवळण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर एक नवा शांती प्रस्ताव ठेवला होता. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. इराणने दिलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचे सांगत ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता अधिकच लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

नेमका प्रस्ताव काय होता?

इराणने आपल्या प्रस्तावात म्हटले होते की, व्यापार आणि जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले होर्मुझ स्ट्रेट पुन्हा जहाजांच्या वाहतुकीसाठी खुले केले जाईल. त्या बदल्यात अमेरिकेने इराणच्या बंदरांवर लादलेली नौदलाची नाकेबंदी मागे घ्यावी. इराणच्या मते, आधी दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा आणि त्यानंतरच अणुकार्यक्रमासारख्या जटिल विषयावर चर्चा व्हावी.

ट्रम्प यांचा 'नो' का?

डोनाल्ड ट्रम्प यांना इराणची ही रणनीती रुचलेली नाही. इराण आधी परिस्थिती सामान्य करू इच्छितो आणि अण्वस्त्रांचा मुद्दा नंतर चर्चेला घेऊ इच्छितो. मात्र, अमेरिकेची अट स्पष्ट आहे की, जोपर्यंत इराण अण्वस्त्रे बनवणार नाही याची लेखी आणि ठोस हमी मिळत नाही, तोपर्यंत अमेरिका मागे हटणार नाही. "इराण अशा अटी ठेवत आहे ज्या आम्ही स्वीकारू शकत नाही," असे सांगत ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

समुद्री व्यापारावर मोठा परिणाम

गेल्या दोन महिन्यांपासून इराणने केवळ स्वतःची जहाजे सोडून खाडीतील इतर सर्व जहाजांची ये-जा रोखली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही इराणी बंदरांवर कडक निर्बंध लादले आहेत. या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून ऊर्जा टंचाईचे संकट गडद झाले आहे.

युद्धविराम अजूनही लांबच

अमेरिका आणि इस्रायलने सुमारे चार आठवड्यांपूर्वी इराणवरील हल्ले थांबवले असले तरी, युद्ध संपवण्यासाठी अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. इराणला आपल्या युरेनियम समृद्ध करण्याच्या अधिकारावर अमेरिकेने मोहोर उमटवावी अशी अपेक्षा आहे, तर अमेरिका अण्वस्त्रबंदीवर ठाम आहे. या परस्परविरोधी भूमिकांमुळे हा तिढा सुटण्याऐवजी अधिकच क्लिष्ट होत चालला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Rejects Iran's Peace Offer, Demands Nuclear Guarantee for Strait Opening

Web Summary : Trump rejected Iran's peace proposal to open the Strait of Hormuz in exchange for lifting naval blockade. He insists on written guarantees against Iranian nuclear weapons development before easing sanctions, prolonging the US-Iran conflict and impacting global oil supplies.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिका