शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:13 IST

West Bengal Assembly Election 2026 Result: मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांवरून उद्भवलेल्या वादानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी ममता बॅनर्जी यांच्या पदरी निराशा पडली आहे. 

संपू्र्ण देशाचं लक्ष लागून असेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याने आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत हिंसाचार फार कमी झाला असला तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. तसेच मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांवरून उद्भवलेल्या वादानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी ममता बॅनर्जी यांच्या पदरी निराशा पडली आहे. 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. तसेच मतमोजणीसाठी केंद्र सरकार आणि केंद्रीय पीएसयू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालात याचिका दाखल केली होती. मात्र अशा प्रकारे नियुक्ती करणे हे नियमांच्या विरोधात नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. तसेच पश्चिम बंगालच्या मतमोजणीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या खटल्यात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ममता बॅनर्जींच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र त्यांचा युक्तिवादनी निष्प्रभ ठरला.

न्यायमूर्ती पीएस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या विशेष खंडपीठाने याबाबत सुनावणी करताना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची कुठलीही आवश्यकता नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, निवडणूक आयोग आपल्या अधिकार क्षेत्रांतर्गत काम करत आहे, असे न्यायमूर्तींनी नमूद केले. याआधी कलकत्ता उच्च न्यायालयातही ममता बॅनर्जी यांना धक्का बसला होता. त्यामुळे मतमोजणीबाबत ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेला लढा त्या हरल्या आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान, आता ४ तारखेला मतमोजणी  पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झालं होतं. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी आटोपलं होतं. आता ४ मे रोजी मतमोजणी होणार असून, मतदारांनी पश्चिम बंगालची सत्ता कुणाच्या हातात सोपली आहे, हेही समोर येणार आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee's Plea Rejected by Supreme Court on Vote Counting

Web Summary : Supreme Court rejected Mamata Banerjee's plea against central staff in Bengal vote counting. Court refused to interfere with Election Commission's decision, upholding its authority. Sibal's arguments failed.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस