नसरापूर ( पुणे जि. ) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडत पुणे-सातारा महामार्ग तब्बल दोन तास रोखून धरला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमराव कांबळे (वय ६ ० , रा. साळवडे, ता. भोर) या आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगून चिमुकलीला गुरांच्या गोठ्याकडे नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालिका निरागसपणे आरोपीसोबत जाताना दिसत आहे. त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}} ही बालिका सुट्टीसाठी आजोळी आली होती. बराच वेळ ती दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ग्रामस्थांनी आरोपीचा माग काढत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.दरम्यान, पोलिसांनी पंचनामा आणि तपास प्रक्रिया सुरू असताना ग्रामस्थांना माहिती न दिल्याचा आरोप करत नागरिक संतप्त झाले. हजारो ग्रामस्थ घटनास्थळी जमले आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत बाजारपेठ बंद ठेवली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी पुणे-सातारा महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तपासादरम्यान आरोपीविरोधात यापूर्वीही महिलांच्या लैंगिक छळाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रकरणात त्याने शिक्षा देखील भोगली होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. १ ५ दिवसांत आरोपपत्र दाखल करून कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे नसरापूरसह संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Web Title : Pune: Minor Girl Brutally Murdered After Sexual Assault; Accused Arrested
Web Summary : In Nasrapur, Pune, a three-year-old girl was sexually assaulted and murdered. The accused lured her away, sparking outrage and protests. Police arrested the suspect, who has a history of similar offenses, and are promising a fast-track trial.
Web Title : पुणे: नाबालिग लड़की के साथ यौन उत्पीड़न के बाद बेरहमी से हत्या; आरोपी गिरफ्तार
Web Summary : पुणे के नसरापुर में, एक तीन वर्षीय लड़की के साथ यौन उत्पीड़न और हत्या की गई। आरोपी उसे बहला-फुसला कर ले गया, जिससे आक्रोश और विरोध प्रदर्शन हुआ। पुलिस ने संदिग्ध को गिरफ्तार कर लिया है, जिसका इसी तरह के अपराधों का इतिहास है, और फास्ट-ट्रैक परीक्षण का वादा कर रही है।