पुणे - राज्यात १२ वी निकाल जाहीर झाला असून यात ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. यंदाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून त्यात ९३.१५ टक्के मुली तर ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात लातूर विभाग सर्वात मागे राहिला आहे. लातूरमध्ये ८४.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या निकालात एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील ३-४ वर्षातील आकडेवारी पाहिली तर २०२३ मध्ये विज्ञान शाखेत ९०.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, २०२४ साली ९७.८२ टक्के, २०२५ साली ९७.३५ टक्के तर यंदा २०२६ मध्ये ९६.४४ टक्के विज्ञान शाखेचे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचसोबतच ९८.०२ टक्के कला शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ८७.०३ टक्के वाणिज्य शाखेचे विद्यार्थी यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी ८२.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. आयटीआयसाठी ८१.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मागील वेळच्या तुलनेत यंदा २.०९ टक्के निकालात घसरण झाली आहे.
बारावीचा निकाल कुठे पाहायचा?
विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in , hscresult.mkcl.org , mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊ शकतात. निकालाची लिंक दुपारी १:०० वाजल्यापासून सक्रिय होईल. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
बारावीचा निकाल कसा पाहायचा?
१. वरीलपैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा.२. होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.३. तुमचा रोल नंबर/आसन क्रमांक टाका.४. आईचे नाव (पहिले नाव) टाइप करा.५. 'View Result' बटणावर क्लिक करा.६. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
Web Summary : Maharashtra's HSC results are out, with an overall pass percentage of 89.79%. Girls outperformed boys, and the Konkan region secured the top spot with 94.14%. Science stream recorded 96.44% pass percentage. Arts recorded 98.02% pass percentage. Commerce saw 87.03% success, and vocational courses achieved 82.74%.
Web Summary : महाराष्ट्र एचएससी के परिणाम घोषित हो गए हैं, जिसमें कुल उत्तीर्ण प्रतिशत 89.79% है। लड़कियों ने लड़कों को पछाड़ दिया, और कोंकण क्षेत्र ने 94.14% के साथ शीर्ष स्थान हासिल किया। विज्ञान स्ट्रीम में 96.44% उत्तीर्ण प्रतिशत दर्ज किया गया। कला में 98.02% वाणिज्य में 87.03% और व्यावसायिक पाठ्यक्रमों में 82.74% सफलता मिली।