शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 10:11 IST

‘ब्रेंट क्रूड’ गेले १२६ डॉलर पार; २००८ च्या जागतिक मंदीनंतर तेलाचे दर सर्वोच्च पातळीवर

नवी दिल्ली - अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याऐवजी युद्धाची ठिणगी अधिक गडद झाल्याने गुरुवारी जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतींचा स्फोट झाला. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल १२६.४१ डॉलरचा टप्पा गुरुवारी ओलांडला होता. मात्र शुक्रवारी हे दर कमी होऊन ते प्रति बॅरल ११४ डॉलरवर स्थिरावले होते. 

अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरली असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळल्याच्या वृत्ताने आगीत तेल ओतले आहे. इराणकडून होणारा तेलपुरवठा ठप्पच राहणार असल्याच्या भीतीने ब्रेंट क्रूडच्या किमतीत ३.३ टक्क्यांनी वाढ होऊन ती १२१.९० डॉलरवर पोहोचली, तर व्यवहारादरम्यान त्याने १२६ डॉलरचा उच्चांक गाठला. युद्ध सुरू होण्यापूर्वी हे दर केवळ ७० डॉलरच्या आसपास होते.

कच्चे तेल १५० डॉलरपर्यंत  जगाच्या तेल व्यापारापैकी ३० टक्के व्यापार ज्या मार्गावरून होतो, ती ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ इराणने रोखली आहे. अमेरिकेने इराणची  नाकेबंदी कडक केल्यास कच्चे तेल १५० डॉलरपर्यंत जाण्याची भीती ‘गोल्डमन सॅक्स’ने व्यक्त केली आहे. 

सर्वाधिक फटका भारतालाकच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमतींचा सर्वाधिक फटका भारतीय शेअर बाजाराला बसला.  गुरुवारी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स ८०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, तर निफ्टीने २३,९०० ची पातळी तोडली. युद्धामुळे भारताला आखाती देशांतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा आलेला नाही. यामुळे देशात तेलाची उपलब्धता कायम  होर्मुजमध्ये अडथळे असूनही सौदी अरेबिया आणि यूएईकडून  भारताची तेल आयात सुरूच राहिली. सौदी अरेबिया आपल्या १२०० किमी लांबीच्या ईस्ट-वेस्ट पाइपलाइनचा वापर करत आहे, जी तेल लाल समुद्रापर्यंत पोहोचवते. अशाच प्रकारे, यूएईने आपल्या ॲडकॉर्प पाइपलाइनद्वारे तेल ओमानच्या आखातापर्यंत पोहोचवून होर्मुझचा मार्ग बायपास केला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’जागतिक बाजारात वाढलेल्या दरामुळे भारतीय तेल कंपन्यांना आता प्रतिलिटर पेट्रोलवर १४ रुपये आणि डिझेलवर १८ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच मोठी इंधन दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते इंधन दरवाढ आता अटळ आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War Sparks Oil Price Surge; India Faces Fuel Price Bomb

Web Summary : Global tensions fuel oil price surge to $126/barrel, impacting India. Stock markets tumble. Despite supply routes being bypassed, fuel price hikes are imminent to offset losses of ₹14/liter on petrol and ₹18/liter on diesel.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरCrude Oilखनिज तेल