पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहत पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील एकूण १५ केंद्रांवर आज सकाळी ७ वाजेपासून फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार आणि गंभीर गैरप्रकार झाल्याचे आरोप भाजपने केले होते, ज्याची दखल घेत निवडणूक आयोगाने हे मतदान रद्द केले होते.
सर्वात मोठा वाद फाल्टा विधानसभा मतदारसंघात निर्माण झाला. येथील एका केंद्रावर ईव्हीएमवरील कमळाच्या चिन्हाचे (भाजप) आणि सीपीएम उमेदवाराच्या नावासमोरील बटण टेप लावून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. फाल्टा येथील आणखी ३० केंद्रांवरही फेरमतदान घेण्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सध्या प्रलंबित आहे.
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात २९ एप्रिल रोजी या मतदान केंद्रांवर मतदान झाले होते, पण निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम ५८(२) अंतर्गत ते रद्द केले आहे. या तरतुदीनुसार, जर मतदान केंद्रावर ईव्हीएममधील बिघाड, बूथ कॅप्चरिंग, हिंसाचार किंवा इतर प्रक्रियात्मक उल्लंघनांसारख्या गंभीर अनियमितता घडल्या, तर निवडणूक आयोगाला मतदान रद्द करण्याचा आणि फेरमतदानाचा आदेश देण्याचा अधिकार आहे.
फाल्टामध्ये ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचे आरोप
पश्चिम बंगालमध्ये २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठा गदारोळ आणि राजकीय वाद निर्माण झाला. मतदारांना आपल्या उमेदवारांची नावे दिसू नयेत म्हणून ईव्हीएमवरील उमेदवारांची बटणे जाणीवपूर्वक टेपने झाकण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. अभिषेक बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी जहांगीर खान फाल्टा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजप नेत्यांनी ईव्हीएम पॅनेलवरील भाजप आणि सीपीएम उमेदवारांच्या नावांभोवती टेप लावलेले व्हिडिओदेखील शेअर केले आहेत.
या वादाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी सांगितले की, जिथे जिथे अशा अनियमितता सिद्ध होतील, तिथे फेरमतदान घेतले जाईल. त्यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेतील कोणत्याही अनियमिततेबाबत निवडणूक आयोगाचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण आहे. अग्रवाल यांनी सांगितले की, फाल्टा येथील ३० मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निरीक्षकांच्या अहवालांच्या आधारे घेतला जाईल. प्राथमिक तपासात मतदानापूर्वी किंवा सराव मतदानादरम्यान अधिकाऱ्यांकडून कोणत्याही अनियमिततेची चिन्हे आढळली नाहीत, त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यानच कथित फेरफार झाला असावा, असा संशय निर्माण झाला आहे.
Web Summary : Repolling began at 15 West Bengal booths after rigging allegations during the April 29th elections. The BJP alleged EVM tampering, especially in Falta, where buttons were taped. An investigation is ongoing, with a decision pending on repolling at 30 more booths.
Web Summary : पश्चिम बंगाल में 29 अप्रैल को हुए चुनावों में हेरफेर के आरोपों के बाद 15 बूथों पर पुनर्मतदान शुरू हुआ। बीजेपी ने ईवीएम में छेड़छाड़ का आरोप लगाया, खासकर फाल्टा में, जहां बटन टेप से चिपकाए गए थे। जांच चल रही है, 30 और बूथों पर पुनर्मतदान पर फैसला लंबित है।