शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 05:57 IST

५ किलो सिलिंडरच्या दरातही २६१ रुपयांनी वाढ, भविष्यात इंधन दरवाढ होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली/मुंबई : केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली. १९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ९९३ रुपये इतकी मोठी वाढ करण्यात आली असून, छोट्या व्यावसायिक ५ किलो सिलिंडरच्या दरातही २६१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सामान्य ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी ३ हजार २४ रुपये मोजावे लागतील. पूर्वी ही किंमत २ हजार ३१ रुपये होती, असे हॉटेल चालकांनी सांगितले. तर ५ किलोचे सिलिंडर आता ५४९ ऐवजी ८१० रुपयांना मिळेल. निवडणुकीनंतर लगेच झालेल्या या दरवाढीमुळे लघुउद्योग, हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टॉल आणि कॅटरिंग व्यवसायांवर थेट परिणाम होणार आहे. तेल कंपन्या दरमहा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, विनिमय दर आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन दर निश्चित करतात. 

पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?

व्यावसायिक सिलिंडर पाठाेपाठ आता पेट्राेल आणि डिझेलच्या दरात ४ ते ५ रुपये आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ हाेण्याचे संकेत शुक्रवारी रात्री अधिकृत सूत्रांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि गेल्या चार वर्षांपासून देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात इंधन दरवाढ होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या आठवड्यात प्रति बॅरल १२६ डॉलर या चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या होत्या. त्यात किंचित घसरण झाली असली, तरी दर अजूनही ११० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त आहेत. होर्मुझमधून होणाऱ्या तेलवाहतुकीवर परिणाम, तसेच इराण आणि अमेरिकेमधील तणाव यामुळे जागतिक तेलबाजारातील अनिश्चितता कायम आहे. यामुळे पुरवठा साखळीवर दबाव वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fuel Price Hike Imminent? Commercial Gas Cylinder Prices Soar After Elections

Web Summary : Commercial LPG cylinder prices significantly increased. Petrol and diesel prices may rise by ₹4-5, domestic gas by ₹50. International crude oil prices and geopolitical tensions are cited as reasons for the potential hike.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCylinderगॅस सिलेंडरCrude Oilखनिज तेल