राजन मंगरूळकर
परभणी : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्प लाईन १०९८ परभणी या टोल फ्री नंबरवर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता गोपनीय माहिती मिळाली होती. यवतमाळ जिह्यातील अपल्वायीन बालीकेचा बालविवाह परभणी शहरात होणार आहे. हा बालविवाह चाईल्ड लाईन हेल्पलाइन पथकासह नानलपेठ पोलीस आणि महिला, बालविकास विभागाने रोखला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तत्काळ बालीका रहिवाशी असलेल्या गावातून ग्रामपंचायत येथील जन्म नोंद याची मागणी करून त्याच्या आधारे खात्री करण्यात आली. ही बालीका १७ वर्ष ६ महिने वयाची आहे आणि ज्या मुलासोबत लग्न होणार होते त्याचे वय २४ वर्ष असल्याचे निष्प्पण झाले. त्यावरून परभणी शहरातील नानलपेठ ठाण्यात हद्दीतील मल्हारनगर याठिकाणी मुलाच्या राहते घरी बालविवाह होणार असल्याने नानलपेठचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांना घटनेची माहिती देण्यात आली.
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी तथा बाल विवाह प्रतिबंध अधिकारी नागरी मिलिंद वाघमारे यांना माहिती देण्यात आली. ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मोनिका रंधवे यांच्या मार्गदर्शनात चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे, सुपरवायझर सय्यद इशरत, केस वर्कर बाळू गुंडे, अंगणवाडी सेविका एस.के. वाळवंटे, नानलपेठचे पीएसआय बुधोडकर, एच.एस. मरगळ, जमादार बी.के. लिंगायत यांनी होणार बाल विवाह मुलाच्या राहते घरी जाऊन समुपदेशनातून रोखला. तसेच बालिकेच्या पुढील काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने तीस बाल कल्याण समिती परभणी यांचे समक्ष हजर करण्यात आले.
Web Summary : Child Helpline received information about an underage girl's wedding in Parbhani. Authorities intervened, stopping the marriage at the groom's residence. The girl, 17 years and 6 months old, was then presented to the Child Welfare Committee for care and protection. The groom was 24 years old.
Web Summary : चाइल्ड हेल्पलाइन को परभणी में एक नाबालिग लड़की की शादी की सूचना मिली। अधिकारियों ने हस्तक्षेप कर दूल्हे के घर पर शादी रुकवाई। 17 साल 6 महीने की लड़की को देखभाल और सुरक्षा के लिए बाल कल्याण समिति के समक्ष पेश किया गया। दूल्हा 24 साल का था।