दिनेश पाठक
नाशिक : भोंदू अशोक खरात यास शुक्रवारी (दि.१) दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. नवव्या गुन्ह्यात त्याला न्यायाधीश बी. बडवे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी युक्तिवाद केला. भोंदू खरातने फिर्यादी असलेल्या व्यापाराकडून अवतार पूजा करायची आहे, असे सांगून चार ते पाच कोटी रुपये या गुन्ह्यात उकळले आहे. याशिवाय फिर्यादीकडून महागडी कार भोंदू खरातने मृत्यूची भीती दाखवून आपल्या ताब्यात घेऊन नंतर ती स्वतः च्या नावावर करून घेतली. इतकेच नव्हे तर परिसाची शक्ती प्राप्त करण्याकरिता २१ देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करेल त्यात तुझा मृत्यु होईल, अशी भिती घालून २१ देशांमध्ये भोंदू खरात हा फिर्यादीच्या पैशांवर मौज मजा करून आला.
गुरुच्या सेवेचे कारण सांगून व दुसऱ्यांदा मृत्युची घालून अमेरिकेत देखील जाऊन भोंदू खरातने फिर्यादीच्या पैशांवर महागडे उपचार केले. त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादीस उत्तरपुजा करण्याचे कारण सांगून ही पूजा न केल्यास तुझा मृत्यु निश्चित आहे, अशी भिती दाखवुन पूजा करण्याच्या नावाने खरातने त्याच्या सिन्नर तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये बांधकामाचा खर्च बळजबरीने वसूल केला. अशा स्वरूपाचे अनेक गंभीर आरोप भोंदू खरात याच्यावर या नवव्या गुन्ह्यात आहे.
या गुन्ह्याचा तपास एसआयटी करीत असून न्यायालयामध्ये या गंभीर गुन्ह्याची माहिती देऊन तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी एसआयटीने मागितली, मात्र न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी भोंदू खरात याला दिली. खरात याच्यावर नाशिकमध्ये एकूण १२ गुन्हे दाखल असून आता या नवव्या गुन्ह्याची सुनावणी सुरू आहे. या १२ गुन्ह्यांमध्ये खरातवर एकूण आठ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे तर चार गुन्हे हे आर्थिक फसवणुकी संदर्भातील आहे.
Web Summary : Ashok Kharat, a fake guru, is in police custody for defrauding a businessman. Kharat allegedly extorted crores, seized a car, and funded 21 foreign trips by falsely promising mystical powers and threatening death. He faces multiple charges, including sexual assault and financial fraud.
Web Summary : फर्जी गुरु अशोक खरात पुलिस हिरासत में हैं। उन्होंने एक व्यापारी से करोड़ों रुपये ठगे, एक कार जब्त की, और जादुई शक्तियों का वादा करके और मौत की धमकी देकर 21 विदेश यात्राओं को वित्त पोषित किया। उन पर यौन उत्पीड़न और वित्तीय धोखाधड़ी सहित कई आरोप हैं।