Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:38 IST

Mumbai Pune Expressway Traffic Jam Supriya Sule: ८ ते १० किमीच्या रांगा, वाढत्या उन्हामुळे वाहनांच्या इंजिनात बिघाड

Mumbai Pune Expressway Traffic Jam Supriya Sule: महाराष्ट्र दिनाची सुटी आणि त्यानंतर आलेला वीकेंड यामुळे नेहमीप्रमाणे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर (Traffic jam on Mumbai-Pune highway) पहाटेपासूनच वाहतूककोंडी पाहायला मिळाली. या वाहतूककोंडीचा फटका सर्वसामान्यांसह खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला. सकाळी जवळपास दोन ते तीन तासापासून त्या वाहतूककोंडीत अडकल्या. सुप्रिया सुळे एक्सप्रेस वे वरील वाहतूककोंडीमुळे एका ठिकाणी महाराष्ट्रदिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. प्रचंड वाहतूककोंडी असल्याने याचा फटका सामान्य प्रवाशांनाही बसला. तसेच, वाढत्या ऊन्हामुळे अनेक वाहनांची इंजिन गरम झाली आणि अनेक वाहनांमध्येही बिघाड झाल्याचे दिसून आले. आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मिसिंग लिंकचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनासाठी द्रुतगती मार्गावर काही ठिकाणी मार्ग वळवण्यात आले आहेत. यामुळेही वाहतूककोंडीत भर पडल्याचे काही प्रवाशांनी म्हटले आहे.

सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे वाहतूक कोंडी

सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहन बंद पडल्याची घटना घडली. आजच मिसिंग लिंकच लोकार्पण सोहळा होत असताना प्रवाशांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवून पुण्याकडची वाहतूक सोडली जात आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतुकही  खोळबंली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूकीच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सुप्रिया सुळे वाहतूककोंडीत अडकल्या...

वाहतूककोंडीचा एक व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, गेले दोन तास आम्ही सगळे वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. सकाळी आम्ही सात वाजता ठाण्यावरून निघालो होतो, आता दोन तास गाडीत बसून आमची आजुबाजूच्या लोकांसोबत मैत्री झाली आहे, तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, सगळे आम्ही वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. त्याचबरोबर आजुबाजूला असलेल्या कारमधील प्रवाशांनी देखील सुळेंच्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, आम्ही देखील ७ वाजता मुंबई-ठाण्यातून निघालो होतो, पण वाहतुककोंडीमुळे आम्हाला त्रास होत आहे.(Supriya Sule in Mumbai-Pune expressway traffic jam)

वाहतूककोंडीमुळे वाहनांमध्ये बिघाड, नागरिक सरकारवर संतापले !

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या कोंडीमुळे वाहने बंद पडण्यास सुरूवात झाली. घाटाची सुरूवात होतानाच तीव्र चढ असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिसरात तीव्र ऊन असल्याने वाहनांची इंजिन गरम होऊन वाहने बंद पडली. वाहतूककोंडीमुळे प्रवाशी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. मिसिंग लिंकचे लोकार्पण दुपारी १ वाजता ठेवण्यात आले आहे, त्यामुळेच ही कोंडी झाली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. भल्या सकाळी किंवा कालच्या दिवसात उद्घाटनाचा घाट घालायला हवा होता, असा सूर प्रवाशांमध्ये दिसून आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Expressway gridlock: Supriya Sule stuck amid holiday traffic.

Web Summary : Holiday weekend caused massive Mumbai-Pune Expressway traffic jams. MP Supriya Sule was also stuck for hours. Missing link inauguration worsened congestion, impacting commuters with vehicle breakdowns due to heat.
टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवाहतूक कोंडीसुप्रिया सुळे