शिवसेना (शिंदे गटाचे) खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हणस्के याचा विवाह सोहळा गुरुवारी पार पडला. या विवाह सोहळ्याला शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) नेते खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली आणि नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. खरेतर राऊतांच्या या उपस्थितीने दोन्ही पक्षातील शिवसैनिक आणि पदाधिकारी चकित झाले. कारण दोन्ही नेते आपापल्या राजकीय मंचांवरू, आपापल्या पक्षाची भूमिका मांडताना अनेक वेळा एकमेकांवर टोकाची 'टीका टिप्पणी' अथवा 'वार प्रतिवार' करताना दिसतात.
राजकारणात हे दोन्ही नेते नेहमीच एकमेकांवर आगपाखड करत असतात. मात्र या विवाहसोहळ्यानिमित्त हे दोन्ही नेते एकत्र दिसून आले. संजय राऊत यांनी वयासपीठावर जाऊन नवदाम्पत्याला पुषपगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. यानंतर, नरेश म्हस्के यांनीही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन राऊतांचे स्वागत केले. लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यातून गाव-गल्लीतील कार्यकर्त्यांनी काय शिकावं? -खरेतर, सार्वजनिक जीवनात आपापल्या पक्ष संघटनेच्या भूमिका मांडताना वरिष्ठ पातळीवरील नेते एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी करत असतात. मात्र एकमेकांच्या खासगी कार्यक्रमात ते आनंदाने सहभागी होताना दिसतात. एकमेकांचे सत्कार करतानाही दिसतात. पण या नेत्यांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे गाव-गल्लीतील त्यांच्या चाहत्यांमध्ये अथवा कार्यकर्त्यांमध्ये एवढे टोकाचे मतभेद निर्माण होतात की ते एकामेकांची अक्षरशः घृणा करू लागतात, एकमेकांशी बोलतही नाहीत, एकमेकांच्या कार्यक्रमातही सहभागी होत नाहीत.
उलट, अनेक वेळा एकमेकांना कडाडून विरोध करणारे वरिष्ठ पातळीवरील नेते एकमेकांच्या खासगी कार्यक्रमात आनंदाने सहभागी होताना आपण बघतो. यावरून, पक्षाचे अथवा सघटनात्मक काम करताना, विरोध हा केवळ राजकीय अथवा वैचारिक असतो, तो वैयक्तिक नसतो, हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीही समजून घ्यायला हवे.
Web Summary : Sanjay Raut attended Naresh Mhaske's son's wedding, surprising many due to their political rivalry. Despite public criticism, leaders show camaraderie in private, a lesson for party workers to separate political differences from personal relationships.
Web Summary : संजय राउत ने नरेश म्हस्के के बेटे की शादी में भाग लिया, जिससे कई लोग हैरान थे क्योंकि उनकी राजनीतिक प्रतिद्वंद्विता है। सार्वजनिक आलोचना के बावजूद, नेता निजी तौर पर सौहार्द दिखाते हैं, जो पार्टी कार्यकर्ताओं के लिए राजनीतिक मतभेदों को व्यक्तिगत रिश्तों से अलग करने का सबक है।