Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 10:39 IST

Strait of Hormuz Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला चकित केलंय. त्यांनी सोशल मीडियावर एक नकाशा शेअर केला आहे, ज्यामध्ये 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'चं नाव बदलून 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' असं लिहिलं आहे.

Strait of Hormuz Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला चकित केलंय. त्यांनी सोशल मीडियावर एक नकाशा शेअर केला आहे, ज्यामध्ये 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'चं (Strait of Hormuz) नाव बदलून 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' (Strait of Trump) असं लिहिलं आहे. ट्रम्प यांनी हा नकाशा अशा वेळी शेअर केला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असून आखाती देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तेलाच्या किमती सतत वाढत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये इराणजवळील हा सागरी मार्ग त्यांच्या नावानं दाखवण्यात आला होता. हा फोटो प्रत्यक्षात त्यांच्या एका समर्थकानं बनवला होता, जो राष्ट्राध्यक्षांनी फॉरवर्ड केला. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी यापूर्वीही बोलता बोलता या मार्गाला स्वतःचं नाव दिलं होतं. एकदा त्यांनी चुकून याला 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हटलं होतं आणि नंतर गमतीनं आपल्याकडून कोणतीही चूक होत नाही आणि आता 'फेक न्यूज' वाले याला मुद्दा बनवतील असं म्हटलं होतं. परंतु या थट्टेमागे एक गंभीर बाब ही आहे की, अमेरिकेनं इराणची नाकेबंदी केली आहे. नाकेबंदी म्हणजे अमेरिकन नौदलाने इराणचे सागरी मार्ग रोखलेत, जेणेकरून तिथून कोणताही व्यापार होऊ शकणार नाही. ट्रम्प यांच्या मते ही नाकेबंदी अजून अनेक महिने सुरू राहू शकते.

Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?

तणाव वाढण्याचं खरं कारण आणि परिणाम

अमेरिका आणि इराणमधील हा वाद आता एका नवीन स्तरावर पोहोचलाय. एप्रिल महिन्यापासूनच अमेरिकेनं इराणच्या बंदरांवर कडक पहारा ठेवला आहे. यामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहेत. कच्च्या तेलाचे दर गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले असून प्रति बॅरल १२० डॉलरच्या पार गेलेत.

'इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर'च्या (Institute for the Study of War) एका अहवालानुसार, इराणचे नेते अहमद वाहिदी आणि तिथले सरकार झुकण्यास तयार नाही. जोपर्यंत अमेरिका हे निर्बंध हटवत नाही, तोपर्यंत ते आपल्या अणू धोरणांवर कोणतीही चर्चा करणार नाहीत, असं इराणचं म्हणणं आहे. इराण आता ओमानसोबत मिळून एक नवीन खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे, जेणेकरून या सागरी मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून ते टॅक्स वसूल करू शकतील.

ट्रम्प विरुद्ध इराण: पुढे काय होण्याची शक्यता?

परिस्थिती बिघडताना पाहून अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी म्हटलं की, या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे मोठं नुकसान होत असून त्यांचे पैसे कमवण्याचे सर्व मार्ग बंद केले जात आहेत. इराणचा तेलाचा धंदा व्यवसाय झाल्यामुळे त्यांना दररोज कोट्यवधी डॉलरचा तोटा होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे, इराणने हे दावे फेटाळून लावले आहेत. इराणच्या संसदेचे स्पीकर मोहम्मद बाघर गालबाफ यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या या गोष्टी पूर्णपणे निरर्थक आहेत आणि यामुळे जगभरातील तेलाच्या किमती अधिक वाढतील. जाणकारांच्या मते, जर ही ओढाताण कमी झाली नाही, तर इराण येमेनच्या हुती बंडखोरांच्या मदतीने इतर सागरी मार्गांवरील जहाजांनाही लक्ष्य करू शकतो, ज्यामुळे संपूर्ण जगासाठी अडचणी वाढू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's 'Strait of Trump' Stunt Amidst Iran Tensions: Map Shared

Web Summary : Donald Trump shared a map renaming the Strait of Hormuz as 'Strait of Trump,' escalating tensions with Iran. This coincides with rising oil prices and US sanctions, potentially impacting global trade and security as Iran considers retaliatory measures with its allies.
टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिका-इस्रायल-इराण वॉर