Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:29 IST

Gold Silver Price Today 1 May: शुक्रवारी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे, तर चांदीच्या किमतीत तेजी आली. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Price Today 1 May: शुक्रवारी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे, तर चांदीच्या किमतीत तेजी आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळच्या सत्रात ट्रेडिंग बंद आहे. संध्याकाळी ५ वाजेपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत यामध्ये कमोडिटी ट्रेडिंग होईल. मागील सत्रात ५ जूनच्या डिलिव्हरीचं सोनं ११४ रुपयांच्या वाढीसह १,५१,२२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. तसंच ५ मे च्या डिलिव्हरीची चांदी देखील १७३ रुपयांच्या वाढीसह २,४४,६३८ रुपये प्रति किलोवर बंद झाली.

'गुड रिटर्न' नुसार आज सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ३८० रुपयांच्या घसरणीसह १,५२,३५० रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोनं  ३५० रुपयांच्या घसरणीसह १,३९,६५० रुपयांवर असून १८ कॅरेट सोनं २९० रुपयांनी घसरून १,१४,२६० रुपयांवर आलेत. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून ती ५,००० रुपयांच्या तेजीसह २,५५,००० रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती.

या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?

सराफा बाजारातील स्थिती

यापूर्वी गुरुवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत २,००० रुपयांनी वधून १.५४ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली होती. जागतिक बाजारातील मजबूत कल आणि कमकुवत डॉलर हे या दरवाढीचं मुख्य कारण आहे. अखिल भारतीय सराफा संघानुसार, ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या किमतीत २,००० रुपये म्हणजेच १.३१ टक्क्यांची वाढ होऊन ते १,५४,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. मागील सत्रात हे सोनं १,५२,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.

मात्र, सराफा संघानुसार चांदीच्या किमतीत १,८०० रुपये म्हणजेच सुमारे एक टक्क्याची घसरण झाली. चांदीची किंमत कमी होऊन २,४२,७०० रुपये प्रति किलो (सर्व करांसह) राहिली, जी बुधवारी २,४४,५०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातील दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या स्पॉट किमतीत ९१.८० डॉलर म्हणजेच २.०२ टक्क्यांची वाढ झाली असून ती ४,६३५.५२ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. त्याच वेळी चांदीची किंमत ३.३१ टक्क्यांनी वाढून ७३.६९ डॉलर प्रति औंस झाली आहे.

काय आहेत नवे दर?

शहर२४ कॅरेट२२ कॅरेट१८ कॅरेट
दिल्ली₹152500₹139800₹114410
मुंबई₹152350₹139650₹114260
कोलकाता₹152350₹139650₹114260
चेन्नई₹153280₹140500₹117500
लखनौ₹152500₹139800₹114410
English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices fall, silver surges ₹5000 on month's first day.

Web Summary : Gold prices decreased while silver soared ₹5000 today. 24-carat gold trades at ₹1,52,350. Silver hits ₹2,55,000 per kg. International gold prices increased to $4,635.52 per ounce.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक