शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 13:09 IST

Brij Bhushan Sharan Singh News: महिला कुस्तीपटूंच्या शोषणाच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपाचे दबंग नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे सध्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

महिला कुस्तीपटूंच्या शोषणाच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपाचे दबंग नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे सध्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पक्षांतर करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चाही उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. जर पक्षाला आम्ही ओझं वाटत असलो तर पक्षाने आता आमची गरज नाही असे एकदा सांगावे, असे स्पष्टपणे ब्रजभूषण शरण सिंह यांनी सांगितले आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणामुळे ब्रिजभूषण सिंह भाजपात अस्वस्थ आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे ब्रिजभूषण सिंह अडचणीत आले होते. तसेच त्यांच्यावरील आरोपांमुळे भाजपाचीही कोंडी झाली होती. त्यामुळेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. त्यांच्या मुलाने विजय मिळवला होता. मात्र पक्षाकडून बाजूला टाकण्यात येत असल्याने ब्रिजभूषण शरण सिंह नाराज आहेत.

आमची गरज नाही असे पक्षाने एकदा सांगावे, २०२७ मध्ये सांगावे, अन्यथा २०२९ मध्ये सांगावे. मग आमची उपयुक्तता आहे की नाही हे आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पक्षाला दिले आहे.  एकीकडे भाजपाबाबत वारंवार नाराजी व्यक्त करत असलेले ब्रजभूषण शरण सिंह हे अखिलेश यादव यांच्याबाबत मात्र सकारात्मकपणे बोलताना दिसत आहेत. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख असलेल्या अखिलेश यादव यांनीही ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंह हे कमळ सोडून सायकलीवर स्वार होण्याचा विचार तर करत नाही आहेत ना, असा प्रश्न  उपस्थित होत आहे.

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह हे समाजवादी पक्षात येणार का, असे विचारले असता अखिलेश यादव यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. अखिलेश यादव यांनी ब्रिजभूषण सिंह यांचा आपला नेता आणि गोंडाचे नेते असा उल्सेख केला. तेव्हापासून या चर्चांना अधिकच जोर आला आहे. ब्रिजभूषण सिंह यांचे समाजवादी पक्षाशी याआधीही संबंध राहिलेले आहेत. भाजपात कोंडी होऊ लागल्यानंतर ते याआधीही समाजवादी पक्षात गेले होते. तसेच २००९ ते २०१४ या काळात ते समाजवादी पक्षाचे खासदार राहिले होते. तर २०१४ मध्ये ते पुन्हा भाजपात आले होते. मात्र त्यांचे मुलायम सिंह यांच्या कुटुंबीयांशी असलेले चांगले संबंध कायम राहिले होते.   

English
हिंदी सारांश
Web Title : Brij Bhushan Singh Unhappy with BJP, Praises Akhilesh Yadav.

Web Summary : Brij Bhushan Singh, facing accusations, is reportedly unhappy with the BJP. He hinted at potentially switching parties before elections, praising Akhilesh Yadav. Singh challenged BJP to state if his services are no longer required, fueling speculation about a shift.
टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश