Join us
Daily Top 2Weekly Top 5

'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 13:19 IST

शाहरुख खान-दीपिकाचा व्हिडीओ व्हायरल, 'किंग'साठी दक्षिण आफ्रिकेत करतायेत शूट

दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केल्याने सध्या चर्चेत आहे. या प्रेग्नंसीतही ती 'राका' आणि 'किंग' या दोन्ही सिनेमांसाठी दमदार ॲक्शन सीन्सचं चित्रीकरण करत आहे. नुकतंच 'किंग' सिनेमाच्या सेटवरुन दीपिका आणि शाहरुख खानचे काही फोटो लीक झाले आहेत. यामध्ये शाहरुख आणि दीपिकाचा खेळकर अंदाजही दिसत आहे. 'जवान' आणि 'पठाण' नंतर ही जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार आहे. दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये 'किंग' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून सेटवरील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवर दोन्ही स्टार्स एका गाण्याचं शूट करत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये दीपिका आणि शाहरुख एकमेकांच्या हातात हात घालून रोमँटिक गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहेत. दीपिकाने केशरी रंगाचा सुंदर फ्लोई ड्रेस परिधान केला असून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसीचा ग्लो दिसत आहे. तर शाहरुख खान स्ट्राईप शर्टमध्ये  हँडसम दिसत आहे. 

'किंग' चित्रपटातील आपले काम पूर्ण केल्यानंतर दीपिका भारतात परतणार असून त्यानंतर ती अल्लू अर्जुनसोबत दिग्दर्शक एटलीच्या 'राका' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. या चित्रपटासाठी तिला सुमारे ५० ते ६० दिवस शूटिंग करायचे आहे. प्रेग्नंसीच्या काळातही दीपिकाने आपले वर्क कमिटमेंट्स पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'किंग' हा चित्रपट शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान यांचा एकत्र पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणसह अभिषेक बच्चन, अनिल कपूर आणि राणी मुखर्जी यांसारखे मोठे कलाकार पाहायला मिळणार असून हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Deepika Padukone and Shah Rukh Khan's 'King' set video surfaces.

Web Summary : Deepika Padukone is filming 'King' with Shah Rukh Khan in South Africa during her second pregnancy. Photos from the set show them shooting a romantic song. The film also stars Suhana Khan and releases December 2026.
टॅग्स :दीपिका पादुकोणशाहरुख खानबॉलिवूड