Jabalpur Boat Tragedy:मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणाजवळ झालेला क्रूझ जहाजाचा दुर्दैवी अपघात झाला. नर्मदा नदीच्या खाडीत सोसाट्याच्या वारा आणि उंच लाटांमुळे पर्यटकांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज अचानक बुडाले. आतापर्यंत या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जणांना वाचवण्यात आले आहे. मध्य प्रदेश सरकारने तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले. कॅबिनेट मंत्री राकेश सिंह आणि मंत्री धर्मेंद्र लोधी रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते. दोन्ही मंत्र्यांनी बचाव कार्यावर सातत्याने लक्ष ठेवले.
जबलपूर अपघातातून एक हृदयद्रावक दृश्य समोर आले आहे. बचाव पथकाने एका आई आणि तिच्या चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला; तेव्हा दोघेही जीवनाच्या अखेरच्या क्षणीही एकमेकांना बिलगलेले होते. आई आणि लहानग्या मुलाचा या अवस्थेतील मृतदेह बाहेर येताच येथील उपस्थितांचे मन हेलावले. मुलाला वाचवण्यासाठी आईने स्वतःच्या लाईफ जॅकेटच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ती क्रूझ शिपमधून बाहेर पडू शकली नाही. ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.
मध्य प्रदेशचे मंत्री राकेश सिंह यांना अश्रु अनावर
महिला आणि तिच्या लहानग्या लेकराचा मृतदेह अंगावर लाईफ जॅकेट बांधलेल्या अवस्थेतच बाहेर काढण्यात आला. हे दृश्य इतके हृदयद्रावक होते की, मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राकेश सिंह यांनाही अश्रु अनावर झाले. दुसरीकडे स्थानिक रहिवाशांनी दोरीच्या साहाय्याने काही प्रवाशांना वाचवले. ज्यांनी लाईफ जॅकेट्स घातले होते, त्यांनाच वाचवता आले. सर्व प्रवाशांना लाइफ जॅकेट्स पुरवण्यात आले नव्हते, असे म्हटले जात होते.
दरम्यान, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अपघाताच्या वेळी नर्मदा नदीच्या खाडीतील हवामान अचानक बिघडले. सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि उंच लाटा उसळू लागल्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, क्रूझ जहाज आधीच अस्थिर होते. असे असूनही, चालकाने ते तात्काळ माघारी फिरवले नाही. प्रशासनाने आता संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Web Summary : A cruise ship capsized near Jabalpur, Madhya Pradesh, killing nine. A mother and child were found dead, embracing. The mother tried to save her child with her life jacket but tragically failed. Minister Rakesh Singh was moved to tears. An investigation is underway.
Web Summary : जबलपुर, मध्य प्रदेश के पास एक क्रूज जहाज पलटने से नौ लोगों की मौत हो गई। एक माँ और बच्चा मृत पाए गए, गले लगे हुए। माँ ने अपनी लाइफ जैकेट से बच्चे को बचाने की कोशिश की लेकिन दुखद रूप से विफल रही। मंत्री राकेश सिंह की आँखों में आँसू आ गए। जांच जारी है।