शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 18:57 IST

मुरादाबादमध्ये एका हैवान पतीने पत्नीला १२ वर्षे सिगरेटचे चटके देऊन छळ केला आणि नंतर तिला घटस्फोट दिला.

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून घरगुती हिंसेची एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल. एका महिलेला तिच्याच घरात तब्बल १२ वर्षे नरकयातना भोगाव्या लागल्या. दारू आणि जुगाराच्या आहारी गेलेला पती पत्नीला मारहाण तर करायचाच, पण त्याही पुढे जाऊन तो तिच्या शरीराचे विविध भाग पेटत्या सिगरेटने डागत असे. या क्रूरतेची सीमा इथेच संपली नाही, तर पतीने पत्नीला बेकायदेशीररीत्या तीन तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिले आहे.

लग्नानंतर सुरू झाला छळाचा खेळ

पीडित महिला फरहा परवीन हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे लग्न १२ वर्षांपूर्वी मुगलपुरा येथील बिलाल याच्याशी झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतरच बिलालचे खरे रूप समोर आले. त्याला दारू आणि जुगाराचे व्यसन जडले होते. जुगारात पैसे हरले किंवा नशेची धुंदी चढली की, त्याचा संपूर्ण राग तो फरहावर काढत असे. फरहाने सांगितले की, बिलाल तिला केवळ बेदम मारहाणच करायचा नाही, तर रागाच्या भरात पेटती सिगरेट तिच्या अंगावर लावून तिला भाजत असे. मुलांच्या भविष्यासाठी आणि समाजाच्या भीतीने फरहाने हे सर्व मुकाट्याने सोसले.

मध्यरात्री घरात घुसून केली मारहाण

या अत्याचाराचा कळस २६ एप्रिलच्या रात्री झाला. रात्री ११.१५च्या सुमारास आरोपी बिलाल फरहाच्या मावशीच्या घरात जबरदस्तीने घुसला, जिथे फरहा सध्या राहत होती. तिथे त्याने फरहाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच वादादरम्यान त्याने फरहाला बेकायदेशीररीत्या 'तीन तलाक' दिला आणि पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांची कठोर कारवाई

न्याय मिळवण्यासाठी फरहाने अखेर नागफनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिची व्यथा ऐकून पोलीसही चक्रावून गेले. मुरादाबाद पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी बिलालविरुद्ध मारहाण, छळ आणि 'मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा'च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. "आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडितेच्या शरीरावरील जखमांची चौकशी केली जात आहे. लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man inflicts cigarette burns, divorces wife after 12 years.

Web Summary : In Muradabad, a man subjected his wife to 12 years of torture, including cigarette burns, fueled by alcohol and gambling. He then illegally divorced her and threw her out. Police have registered a case and are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी