शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5

जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 20:32 IST

1 / 6
उन्हाळा सुरू झाला की, घरात सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे एअर कंडिशनर. मात्र, जर तुमचा एसी जुना झाला असेल आणि वारंवार नादुरुस्त होत असेल, तर तुमच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो - तो रिपेअर करावा की रिप्लेस? अनेकांना रिपेअरिंग स्वस्त वाटते, तर काहींना नव्या एसीचे तंत्रज्ञान आकर्षित करते. जर तुम्हीही याच गोंधळात असाल, तर काही मुद्दे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील.
2 / 6
साधारणपणे एका एसीचे आयुष्य १० ते १५ वर्षे असते. जर तुमचा एसी १० वर्षांहून अधिक जुना झाला असेल आणि दर महिन्याला त्यात काहीतरी बिघाड होत असेल, तर तो बदलणेच शहाणपणाचे ठरेल. जुन्या एसीचे सुटे भाग मिळणे कठीण होते आणि दुरुस्तीवर होणारा खर्च काही दिवसांनी नव्या एसीच्या किमतीइतकाच होतो. अशा वेळी वारंवार हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा 'लॉन्ग टर्म' विचार करून नवीन एसी घेणे फायदेशीर ठरते.
3 / 6
जसा एसी जुना होतो, तशी त्याची कार्यक्षमता कमी होते. त्याचे पार्ट्स घासले गेल्यामुळे किंवा जुन्या तंत्रज्ञानामुळे तो जास्त वीज खेचू लागतो. सध्या बाजारात 'इन्व्हर्टर एसी' आणि 'स्टार रेटिंग' असलेले अनेक एनर्जी एफिशिएंट मॉडेल्स उपलब्ध आहेत. जुन्या एसीच्या तुलनेत नवीन एसी ५० टक्क्यांपर्यंत विजेची बचत करू शकतात. त्यामुळे जर जुन्या एसीमुळे तुमचे वीज बिल अव्वाच्या सव्वा येत असेल, तर तो बदलणे हाच स्मार्ट पर्याय आहे.
4 / 6
जर तुम्हाला जुना एसी दुरुस्तही करायचा नसेल आणि सध्या नवीन एसी विकत घेण्याचे बजेट नसेल, तर 'एसी रेंट'वर घेणे हा एक उत्तम मधला मार्ग आहे. बाजारात असे अनेक वेंडर आहेत जे मासिक भाड्यावर एसी उपलब्ध करून देतात. विशेषतः जे लोक नोकरीनिमित्त भाड्याच्या घरात राहतात आणि वारंवार घर बदलतात, त्यांच्यासाठी हा पर्याय अत्यंत सोयीचा आणि स्वस्त पडतो. यात मेंटेनन्सची जबाबदारीही अनेकदा वेंडरचीच असते.
5 / 6
जुन्या एसीमध्ये वापरला जाणारा गॅस आणि त्याचे फिल्टर आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या तुलनेत मागे पडले आहेत. नवीन एसीमध्ये हवा शुद्ध करणारे, वाय-फाय कनेक्टिव्हिटी आणि वेगवान कुलिंग देणारे फिचर्स असतात. आरोग्याच्या दृष्टीने आणि आरामदायी अनुभवासाठी नवीन तंत्रज्ञान कधीही सरस ठरते.
6 / 6
जर दुरुस्तीचा खर्च नव्या एसीच्या किमतीच्या ४० टक्क्यांहून अधिक असेल आणि एसी ८ वर्षांपेक्षा जुना असेल, तर डोळे झाकून तो बदलून नवीन घेतलेलाच बरा!
टॅग्स :technologyतंत्रज्ञान