शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 18:27 IST

Pm Narendra Modi letter to CM Devendra Fadnavis: राज्याला सर्वतोपरी पाठबळ देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो, असेही ते म्हणाले

Pm Narendra Modi letter to CM Devendra Fadnavis: १ मे रोजी साजरा होणारा 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिन' हा प्रत्येक मराठी मनासाठी सार्थ अभिमानाचा आणि श्रमिकांच्या अमूल्य कष्टाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पत्र लिहिले. या पत्राची प्रत फडणवीसांनी पोस्ट केली. "खूप खूप आभार पंतप्रधाननरेंद्र मोदीजी. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रदिनी आपल्या शुभेच्छा प्राप्त होणे, हा आमचा आनंद अधिक द्विगुणित करणारा आहे. महाराष्ट्राची थोर परंपरा, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान, महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत योगदान यापासून ते अगदी गडचिरोलीतील नवबदलांचा सुद्धा अतिशय समर्पक मागोवा आपण या पत्रातून घेतला. आपले शब्द, आपले मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्याने आपला महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहात. यापुढेही आपले असेच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहील, ही खात्री आहे. आपण आवर्जून या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार मानतो," अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर जसाच्या तसा...

देवेंद्र फडणवीस जी,

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त तुम्हाला आणि महाराष्ट्राच्या माझ्या प्रिय भगिनी आणि बांधवांना माझ्याकडून अनेक शुभेच्छा. प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीसाठी हा अत्यंत खास दिवस आहे. यानिमित्ताने आपण सर्वजण या राज्याला आणि त्याच्या संस्कृतीला वंदन करत आहोत, ज्या राज्याने आपल्या देशाची आणि समाजाची अनन्यसाधारण जडणघडण केली आहे.

आपल्या नागरी संस्कृतीसाठी महाराष्ट्र हा प्रेरणेचा एक चिरंतन स्रोत राहिला आहे. हे राज्य म्हणजे शौर्य आणि नीतीमूल्ये, समर्पण आणि बहुआयामीत्व, तसंच समाजसुधारणा आणि राष्ट्र उभारणीची एक गुंफणच आहे. ही ती भूमी आहे जिथे कोकण किनारपट्टीवर आणि सह्याद्रीत वीर नायकांच्या शौर्याचा निनाद दुमदुमतो, जिथे भक्ती चळवळ आणि वारकरी संप्रदायाने समाजसुधारणेची ज्योत प्रज्वलित केली, जिथे सामाजिक न्यायाला सर्वात प्रबळ अभिव्यक्ती लाभली आणि जिथून आधुनिक भारताला, विशेषतः आपल्या आर्थिक प्रगतीला सातत्याने बळ मिळत आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजरामर प्रेरणेचे वरदान लाभले आहे, त्यांनी मांडलेली स्वराज्याची संकल्पना आजही सुशासन, शौर्य आणि राष्ट्रीय अभिमानासाठीचा एक कालातीत मार्गदर्शक म्हणून कायम आहे. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्धारक विचारांनी समृद्ध झालेले राज्य आहे, आजही त्यांचे विचार आपल्या लोकशाहीवादी वाटचालीला प्रकाशवाट दाखवत आहेत. लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांच्यासारख्या नेत्यांकडून या भूमीने देशभक्तीच्या भावनेची प्रेरणा घेतली. यासोबतच इथल्या संत परंपरेच्या गहिऱ्या अध्यात्मिक आणि नैतिक बळाचे वरदान या राज्याला लाभले असून, त्यातूनच महाराष्ट्राची आत्मिक जडणघडण झाली आहे.

हे वर्ष महाराष्ट्रासाठी अत्यंत विशेष वर्ष असल्याची जाणीवही मला आहे. कारण यंदा आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३००वी जयंती, महात्मा फुले यांची २००वी जयंती, संत गाडगेबाबा यांची १५०वी जयंती, महाड इथल्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष, बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची १०० वर्षे साजरी करणार आहोत. हा प्रत्येक ऐतिहासिक टप्पा समाजसुधारणा, महिलांचे सक्षमीकरण, आध्यात्मिक जागृती, न्याय आणि सांस्कृतिक अस्मिता या आणि अशा महाराष्ट्राच्या महानतेच्या विविधांगी रूपांचे स्मरण करून देणारा आहे. त्यामुळेच तर महाराष्ट्र राज्य सरकारने हे वर्ष समता आणि सामाजिक समरसता वर्ष म्हणून समर्पित करणे हे अत्यंत समर्पक आहे.

मला वैयक्तिक पातळीवर अत्यंतिक आनंद देणाऱ्या तीन बाबी आहेत. पहिली बाब म्हणजे मराठा साम्राज्याच्या 12 किल्ल्यांचा, (ज्यातील 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत), युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झालेला समावेश. हे किल्ले म्हणजे शौर्य, स्वाभिमान आणि कुशाग्र युद्धनीतीची जिवंत प्रतीके आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे, २०२४ मध्ये सुंदर मराठी भाषेचा अभिजात भाषांच्या यादीत समावेश करण्याचा सन्मान आमच्या एनडीए सरकारला मिळाला. ही एक दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. मराठी भाषेने भारताचा बौद्धिक आणि आध्यात्मिक वारसा समृद्ध केला आहे. आणि तिसरी बाब म्हणजे, गेल्या वर्षी संविधान दिनानिमित्त पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण, ज्यांचा प्रभाव खऱ्या अर्थान जागतिक आहे, अशा एका महान व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली ही एक मोठी आदरांजली होती.

भारताच्च्या आर्थिक परिवर्तनात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उद्योगापासून ते नवोन्मेषापर्यंत, वित्तपुरवठा ते उत्पादनापर्यंत, वाणिज्यापासून ते सर्जनशीलतेपर्यंत, भारताच्या प्रगतीमधील महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय आहे. महाराष्ट्र हे राज्य गुंतवणूकदारांसाठी देखील पहिले पसंतीचे ठिकाण राहिले आहे, त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये ते अग्रणी बनले आहे. आपले सरकार राज्याच्या आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही, हे पाहून मला आनंद झाला. 'विकसित महाराष्ट्राची संकल्पना, 2047 पर्यंत 'विकसित भारत' साकार करण्याच्या आपल्या सामायिक स्वप्नाशी उत्तम प्रकारे जोडलेली आहे. महाराष्ट्र सरकारने वाची विचारपूर्वक तीन टप्प्यांत रचना केली आहे: 2029, 2035 (महाराष्ट्राचा अमृत महोत्सव) आणि 2047, ही वस्तुस्थिती तात्काळ कृती आणि दीर्घकालीन राष्ट्रीय उद्दिष्ट या दोन्हींचे दर्शन घडवते.

महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारचे पाठबळ पूर्वपिक्षा अधिक बळकट आहे! 2025-26 मध्ये महाराष्ट्राला महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 24,000 कोटी रुपयांची विक्रमी निधी देण्यात आला. महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. त्या अधिक मजबूत करण्यासाठी, महत्त्वपूर्ण विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. गेल्याच वर्षी, मुंबई मेट्रोच्या 'अॅक्वा लाईन'चा विस्तार करण्यात आला. नवी मुंबई विमानतळ संपूर्ण देशाच्या, विशेषतः मुंबई परिसराच्या विकासाला कशी चालना देईल याबद्दल देशभरात चर्चा सुरू आहे. वाढवण बंदर भारताच्या व्यापारी महत्त्वाकांक्षांना बळकटी देणारे एक प्रमुख सागरी प्रवेशद्वार बनेल. शक्तीपीठ महामार्गाला विकासात्मक आणि सांस्कृतिक असे दुहेरी महत्त्व आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील बिडकीन औद्योगिक क्षेत्र हे औद्योगिक विकास आणि नवोन्मेषाचे भविष्यवेधी केंद्र म्हणून उदवास येण्यास पूर्णपणे सज्ज आहे. या आणि इतर अनेक प्रकल्पांमुळे राज्यात लाखो रोजगार निर्माण होतील आणि भारत आत्मनिर्भर होईल.

डेटा सेंटर्स, डिजिटल पायाभूत सुविधा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आपले नेतृत्व कायम ठेवत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. गेल्या वर्षी वेव्हज् शिखर परिषदे'साठी मुंबईला दिलेली भेट मला स्मरते. एक चैतन्यमयी चित्रपट आणि सर्जनशील उद्योगाचे केंद्रस्थान म्हणून, आँरेज इकॉनॉमी (केशरी अर्थव्यवस्था) मजबूत करण्यात महाराष्ट्र एका आधारस्तंभाची भूमिका बजावत राहील.

अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या उत्साही वातावरणाला पूरक अशी नवीन विकास केंद्रे उदयाला आली आहेत, हे चित्र अतिशय आनंददायी आहे. काही वर्षांपूर्वी जर कोणी गडचिरोली, अमरावती, धुळे आणि नंदुरबार सारख्या ठिकाणी गुंतवणूक करण्यास सांगितले असते, तर ते अशक्य मानले गेले असते, परंतु आता ही ठिकाणे आत्मविश्वासाने विकासाच्या नकाशावर येत आहेत. विशेषतः गडचिरोलीमध्ये झालेला बदल उल्लेखनीय आहे. माओवाद आणि डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाचा प्रभाव ओसरल्यामुळे एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आता एकट्या गडचिरोलीसारख्या ठिकाणी हजारो कोटींची गुंतवणूक होत आहे.

तुमच्या मागील कार्यकाळात, तुम्ही पाण्याची टंचाई असलेल्या भागांत, विशेषतः मराठवाडा विभागात पाणी नेण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. मला आनंद आहे की, हाच मार्ग तुम्ही आणि तुमच्या चमूने मोठ्या जोमाने पुढे नेला आहे. जेव्हा राज्याच्या विविध भागांत पाणी पोहोचते, तेव्हा आपल्या कष्टाळू शेतकऱ्यांइतका आनंद इतर कोणालाही होत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देशाला खूप काही शिकवले आहे, विशेषतः एक भक्कम सहकारी जाळे ज्या मुळे उपजीविकेसोबतच सन्मानही वाढतो.

येणाऱ्या काळात, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभ मेळ्यासाठी महाराष्ट्रात देशभरातून भाविक येऊ लागतील. या महत्त्वाच्या आध्यात्मिक मेळाव्याची तयारी करणाऱ्या स्थानिक प्रशासनाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. केंद्र सरकारच्या 'प्रसाद' (PRASHAD) योजनेअंतर्गत, त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी काम केले जात आहे.

महाराष्ट्रातील जनतेसाठी 2026 या वर्षात काही दुःखद घटना देखील घडल्या आहेत. श्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर आशा भोसले जी यांना देखील आपण गमावले आहे. त्यांचे जीवन आणि त्यांचे कार्य यांच्या आठवणी कायम लोकांना प्रेरणा देत राहतील, अशी मला खात्री आहे.

विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनण्याच्या आपल्या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक असेल. या महाराष्ट्र दिनी, आपण आधुनिक महाराष्ट्राच्या असंख्य निर्मात्यांचे... कामगार, शेतकरी, संत, समाजसुधारक, उद्योजक, कलाकार आणि सर्वसामान्य नागरिक, ज्यांच्या श्रमामुळे हे राज्य असामान्य बनले आहे, त्यांचे आदरपूर्वक स्मरण करतो. राज्याला सर्वतोपरी पाठबळ देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो, जय महाराष्ट्र!

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi's letter to CM Fadnavis on Maharashtra Day: Key points.

Web Summary : On Maharashtra Day, PM Modi sent CM Fadnavis a letter highlighting the state's rich culture, economic contributions, and progress. Modi praised Maharashtra's heritage, governance, and its role in India's development, assuring continued support from the central government.
टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस