शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 05:42 IST

मिसिंग लिंक प्रकल्पाचे थाटामाटात लोकार्पण, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास    

मुंबई - आज मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई प्रवासाचे जे स्वप्न पाहिले होते त्याचा एक टप्पा पूर्ण होत आहे. आजपासून या प्रकल्पाला मिसिंग लिंक नाही, तर ‘कनेक्टिंग लिंक’ संबोधले जावे. तसेच त्याचे लवकरच नामकरण केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. 

‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल. या ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. 

नियम मोडणाऱ्या वाहनांना चालान संपूर्ण मार्गावर २४ तास सीसीटीव्हीची देखरेख असून, लेनची शिस्त पाळली जावी, यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट घरी मोठ्या दंडाचे ई-चालान पाठविले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला.

‘ॲक्सेस कंट्रोल ग्रीड’वर काम सुरू : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमहाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ ७-८ तासांत पोहोचता यावे, यासाठी सरकार ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रीड’वर काम करीत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केले गाडीचे सारथ्यमिसिंग प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वतः गाडीचे स्टिअरिंग हाती घेऊन मिसिंग लिंकमधून गाडी चालविली. यावेळी गाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune-Mumbai Missing Link Project Completed, to be Named Soon

Web Summary : The Mumbai-Pune Missing Link project is now a 'Connecting Link,' says CM Fadnavis. Expected to boost the state's economy by ₹70,000 crore, the link features intelligent traffic management with e-challans for violators. The government is also working on an 'Access Control Grid'.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMumbai Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे