मुंबई - आठ वर्षांच्या मुलीच्या ओठांवर जबरदस्तीने चुंबन घेतल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने बुधवारी एका ३१ वर्षीय व्यक्तीस पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा प्रकार लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो), २०१२ अंतर्गत ‘गंभीर लैंगिक अत्याचार’ असल्याचे ठरवले.
न्यायालयाने आरोपीला १० हजार रुपये दंडही ठोठावला. “मुलीच्या कोवळ्या वयाचा आणि असुरक्षिततेचा फायदा घेत हा गुन्हा करण्यात आला असून, त्यामुळे पीडित मुलगी तसेच तिच्या पालकांवरही मानसिक आघात झाला,” असे न्यायालयाने नमूद केले. कुटुंबांतील पूर्वीच्या वादांमुळे खोटा गुन्हा दाखल केल्याचा बचाव पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यासाठी पुरावे नसल्याचे नमूद करत अल्पवयीन साक्षीदाराने आरोपीला खोटेपणाने गुन्ह्यात गोवण्याचे कारण नाही असे न्यायालयाने म्हटले. तसेच, आरोपीने घटनास्थळी उपस्थिती नाकारलेली नाही, असेही नमूद केले. अभियोजन पक्षाने गुन्हा सिद्ध करण्यात यश मिळवले आहे, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
मुलीच्या साक्षीवर भरन्यायालयाने मुख्यतः मुलीच्या साक्षीवर भर दिला, तिने दिलेली साक्ष ‘स्पष्ट आणि ठोस’ असल्याचे नमूद केले. तिचे न्यायाधीशांसमोर दिलेले जबाब, तत्काळ नोंदविलला गुन्हा तसेच आई आणि शेजाऱ्यांची साक्ष यामुळे तिच्या कथनाला पुष्टी मिळते, असे न्यायालयाने म्हटले. तक्रार करण्यात कोणताही विलंब झाला नसल्याने ‘खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी होते,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले. हा प्रकार “पीडित मुलीच्या राहत्या परिसरात” करण्यात आला असून, तो आरोपीच्या “निर्भय लैंगिक हेतूचे” आणि कायद्याबद्दलच्या बेफिकिरीचे द्योतक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
Web Summary : Mumbai court sentenced a 31-year-old man to five years for forcibly kissing an eight-year-old girl. The court deemed it a severe sexual assault under POCSO, citing the girl's vulnerability and the resulting trauma. The defense's claim of a false accusation was rejected.
Web Summary : मुंबई की अदालत ने आठ साल की बच्ची को जबरन चूमने के मामले में 31 वर्षीय व्यक्ति को पांच साल की सजा सुनाई। अदालत ने इसे पॉक्सो के तहत गंभीर यौन हमला माना, बच्ची की भेद्यता और परिणामी आघात का हवाला दिया। झूठे आरोप के बचाव के दावे को खारिज कर दिया गया।