पुणे - सेल्फीचा माेह सहलीसाठी आलेल्या तीन मित्रांच्या जिवावर बेतला. ही दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. अजय गरुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार अशी मृतांची नावे आहेत.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सहा मित्रांचा एक गट सहलीसाठी येथे आला होता. यापैकी चौघे गुडघ्यापर्यंत पाण्यात उभे राहून सेल्फी काढत होते. त्यावेळी काठाजवळ उभा असलेला एक जण घसरून खोल पाण्यात पडला. चारही जणांनी एकमेकांच्या मानेभोवती हात घातलेले असल्याने एकामागून एक पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले.
...अन् एकाला वाचविण्यात यशघटनास्थळापासून थोड्या अंतरावर उभा असलेला मित्र मदतीसाठी धावला. त्याने एकाला बाहेर काढले. मात्र, उर्वरित तिघे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ आणि ‘शिवदुर्ग रेस्क्यू ग्रुप’चे पथक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करीत आहेत.
Web Summary : Three friends drowned in Jadhavwadi dam near Pune while taking selfies. One companion was rescued. A group of six friends from Bhosari had come for an outing. Rescue teams recovered the bodies. Police are investigating.
Web Summary : पुणे के पास जाधववाड़ी बांध में सेल्फी लेते समय तीन दोस्त डूब गए। एक साथी को बचाया गया। भोसरी के छह दोस्तों का एक समूह घूमने आया था। बचाव दल ने शव बरामद किए। पुलिस जांच कर रही है।