मुंबई - मुंबई-पुणे अंतर कमी करणाऱ्या मिसिंग प्रकल्पात तब्बल ८.८७ किमी लांबीच्या बोगद्यात एखादा अपघात घडून वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी सुरुवातीला अवजड वाहने आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, हा मार्ग सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यावरून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणारे टँकर धावत असल्याचे चित्र होते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांच्या प्रवेशाला मनाई करणारी यंत्रणाच कार्यान्वित केली नसल्याचे उघड झाले.
यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर या प्रकल्पामुळे ६ किमीने कमी होईल. यात १३.३ किमी लांबीच्या मार्गाची उभारणी करण्यात आली असून, त्यासाठी सुमारे २३.७५ मीटर रुंदीचे जगातील सर्वांत रुंद दोन बोगदे उभारण्यात आले आहेत.
काही महिन्यांपूर्वी चोवीस तास कोंडी सहन करावी लागली हाेतीकाही महिन्यांपूर्वी बोरघाट येथे अति ज्वालाग्रही वायूचा टँकर उलटून महामार्ग बंद झाला होता. त्यातून मुंबई - पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चोवीस तास रांगेत अडकून पडावे लागले होते. भविष्यात ही परिस्थिती मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्यात घडून एखादी दुर्घटना घडू नये यासाठी अवजड आणि ज्वालाग्रही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी मिसिंग लिंकची पुण्याकडील बाजू वाहतुकीला सुरू करण्यात आली. यावेळी ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणारे टँकर सर्रास धावत असल्याचे दिसून आले.
कोंडी फोडण्यासाठी २५ मिनिटांचे ब्लॉकदरम्यान, पुण्याकडे येणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी २५ मिनिटांचे ब्लॉक घेतले जात होते. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी पुणे लेनवर पंधरा मिनिटांचा ब्लॉक घेतला. मात्र, वाहतूक सुरळीत होत नव्हती.
Web Summary : Despite a ban, flammable materials were transported through the Missing Link tunnel on its opening day. This raises concerns about safety and the enforcement of restrictions on heavy vehicles using the new route intended to reduce travel time between Mumbai and Pune.
Web Summary : प्रतिबंध के बावजूद, मिसिंग लिंक सुरंग के खुलने के दिन ही ज्वलनशील पदार्थों का परिवहन किया गया। यह सुरक्षा और मुंबई और पुणे के बीच यात्रा के समय को कम करने के उद्देश्य से बनाए गए नए मार्ग का उपयोग करने वाले भारी वाहनों पर प्रतिबंध के प्रवर्तन के बारे में चिंताएं बढ़ाता है।