मुंबई - म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्याने या घरांना अर्जदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून लॉटरीसाठी अर्ज करण्याकरिता मुदत वाढवून देण्याची नामुष्की म्हाडावर ओढावली होती. आता किमान लाखांवर अर्ज यावेत आणि घरांना प्रतिसाद मिळावा, म्हणून म्हाडाने विक्रोळी येथील १ हजार २१ घरांच्या किमतीही ७.५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २,६४० घरांच्या विक्रीसाठी जाहीर संगणकीय सोडत प्रणालीमधील विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १,२२१ घरांच्या किमतीत ७.५ टक्के कपात केली आहे. या प्रकल्पातील घरांना प्रति घर १ वाहनतळ (पार्किंग) विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली. दरम्यान, २ हजार ६४० घरांसाठी १४ मेपर्यंत अर्ज करता येणार असून, ५ जून रोजी घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
ताबा देण्यापूर्वी करणार डागडुजीलॉटरीमधील ही घरे विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबुर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर, पहाडी गोरेगाव, वडाळा येथे आहेत. या सदनिकांचा ताबा देण्यापूर्वी म्हाडाकडून डागडुजी, दुरुस्ती करून दिली जाईल. तसेच, सदनिकेचा मालमत्ता कर व सहकारी गृहनिर्माण संस्थेचा देखभाल खर्च थकित असल्यास म्हाडातर्फे भरला जाईल.
कुठे: संकेत क्रमांक ५३८, बिल्डींग नं. २ अ, ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळीमूळ किंमत : १ कोटी ४५ लाख ५८ हजार ३०७ ते १ कोटी ४७ लाख ९७ हजार ९९२ सुधारित किंमत : १ कोटी ३४ लाख ६६ हजार ४३४ ते १ कोटी ३६ लाख ८८ हजार १४३
कन्नमवार नगर ७४१
कुठे : ५३९ बिल्डींग नं. ३ अ, ब, क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळीमूळ किंमत : १ कोटी ४५ लाख ७४ हजार ९४२ ते १ कोटी ४८ लाख १४ हजार ९०१ सुधारित किंमत : १ कोटी ३४ लाख ८१ हजार ८२१ ते १ कोटी ३७ लाख ३ हजार ७८३
Web Summary : Due to poor response, MHADA reduced Vikhroli house prices by 7.5%. 1,221 flats in Kannamwar Nagar project now cheaper. Free parking provided. Application deadline extended to May 14; lottery on June 5. MHADA will repair flats before handover.
Web Summary : खराब प्रतिक्रिया के कारण, MHADA ने विक्रोली में घरों की कीमतें 7.5% घटाईं। कन्नमवार नगर परियोजना में 1,221 फ्लैट अब सस्ते। मुफ्त पार्किंग उपलब्ध। आवेदन की अंतिम तिथि 14 मई तक बढ़ाई गई; लॉटरी 5 जून को। MHADA हैंडओवर से पहले फ्लैटों की मरम्मत करेगा।