नाशिक : भोंदू अशोक खरात यास शुक्रवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. नवव्या गुन्ह्यात त्याला न्यायाधीश बी. बडवे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे, तसेच सहायक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी युक्तिवाद केला. भोंदू खरातने फिर्यादी असलेल्या व्यापाराकडून अवतार पूजा करायची आहे, असे सांगून चार ते पाच कोटी रुपये या गुन्ह्यात उकळले आहे. याशिवाय फिर्यादीकडून महागडी कार भोंदू खरातने मृत्यूची भीती दाखवून आपल्या ताब्यात घेऊन नंतर ती स्वतः च्या नावावर करून घेतली. अशा प्रकारे आणखी काेणाची फसवणूक झाली आहे का याचा तपास पाेलिस करत आहेत.
नाशिकमध्ये आतापर्यंत १२ गुन्ह्यांची नाेंद गुन्ह्याचा तपास एसआयटी करीत असून, न्यायालयामध्ये या गंभीर गुन्ह्याची माहिती देऊन तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी एसआयटीने मागितली, मात्र न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी भोंदू खरात याला दिली. खरातवर नाशिकमध्ये १२ गुन्हे दाखल असून, नवव्या गुन्ह्याची सुनावणी सुरू आहे. या गुन्ह्यांमध्ये आठ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे, तर चार गुन्हे हे आर्थिक फसवणुकीसंदर्भातील आहे.
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’ खरात याने परिसाची शक्ती प्राप्त करण्याकरिता २१ देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करेल, त्यात तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालून २१ देशांमध्ये भोंदू खरात हा फिर्यादीच्या पैशांवर मौज मजा करून आला. गुरूच्या सेवेचे कारण सांगून व दुसऱ्यांदा मृत्यूची भीती घालून अमेरिकेतदेखील जाऊन भोंदू खरातने फिर्यादीच्या पैशांवर महागडे उपचार केले. काही दिवसांनी फिर्यादीस उत्तरपूजा करण्याचे कारण सांगून ही पूजा न केल्यास तुझा मृत्यू निश्चित आहे, अशी भीती दाखवून पूजा करण्याच्या नावाने खरातने त्याच्या सिन्नर तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये बांधकामाचा खर्च बळजबरीने वसूल केला.
Web Summary : Ashok Kharat, a fraud, received four days' police custody for swindling a businessman. He extorted crores, seized a car, and funded lavish foreign trips by threatening death. Police investigate further victims and previous sexual assault charges.
Web Summary : फर्जी अशोक खरात को एक व्यवसायी को ठगने के आरोप में चार दिन की पुलिस हिरासत मिली। उसने करोड़ों वसूले, एक कार जब्त की और मौत की धमकी देकर विदेश यात्राओं के लिए धन जुटाया। पुलिस अन्य पीड़ितों और पहले के यौन उत्पीड़न के आरोपों की जांच कर रही है।