अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रधारी देश बनण्यापासून रोखणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. इराणच्या हाती अण्वस्त्रे लागली, तर ते संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरेल. त्यामुळे इराणवर कडक निर्बंध आणि दबाव कायम ठेवण्याची गरज आहे, असे ट्रम्प यांनी नाटो देशांना म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "तुम्ही इराणला अण्वस्त्रे देऊ शकत नाही, कारण ते त्याचा वापर सर्वात आधी इस्रायलवर करतील. त्यानंतर त्यांचा मोर्चा मध्य पूर्व आणि युरोपवर वळवतील. मला खात्री आहे की, त्यानंतर त्यांचा पुढचा निशाणा अमेरिका असेल. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. इराण अण्वस्त्रधारी देश बनल्यास केवळ एका देशासाठी नाही तर, संपूर्ण मानवजातीसाठी विनाशाचे कारण ठरू शकतो. त्यामुळे इराणला अण्वस्त्रधारी देश बनण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका कुठल्याही थराला जाऊ शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना इराणची लष्करी आणि राजकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असा दावा केला आहे. इराणची संरक्षण यंत्रणा आता केवळ नावापुरती उरली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, इराणचे नौदल आणि हवाई दल आता युद्धक्षम राहिलेले नाही. इराणची रडार यंत्रणा आणि विमानविरोधी यंत्रणा नष्ट झाली आहे. लष्करी कारवाईत इराणचे महत्त्वाचे नेते मारले गेल्यामुळे किंवा निष्प्रभ झाल्यामुळे आदेश देणारी साखळीच अस्तित्वात नाही.
इराणमध्ये सध्या सत्तेसाठी अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे ट्रम्प यांनी अधोरेखित केले. "इराणचे नेतृत्व एकसंध राहिलेले नाही, तिथे ३ ते ४ वेगवेगळे गट सक्रिय आहेत. प्रत्येक गट करारासाठी इच्छुक असला तरी त्यांच्यात एकवाक्यता नसल्यामुळे वाटाघाटींमध्ये गोंधळ उडालेला आहे. या विस्कळीतपणामुळे इराणला अमेरिकेसमोर एक ठोस आणि समाधानकारक प्रस्ताव ठेवता येत नाहीये", असेही ट्रम्प म्हणाले.
Web Summary : Trump cautioned NATO against Iran acquiring nuclear weapons, citing potential devastation for Israel, the Middle East, Europe, and eventually, the US. He claimed Iran's military is collapsing, and internal power struggles hinder negotiations.
Web Summary : ट्रंप ने नाटो को ईरान को परमाणु हथियार देने के खिलाफ चेतावनी दी, इजरायल, मध्य पूर्व, यूरोप और अंततः अमेरिका के लिए संभावित विनाश का हवाला दिया। उन्होंने दावा किया कि ईरान की सेना ढह रही है, और आंतरिक सत्ता संघर्ष वार्ताओं को बाधित कर रहे हैं।