शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:39 IST

Pune Crime News: भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निरागस बालिकेवर ६० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केला. संतापलेल्या ग्रामस्थांनी आरोपीला पोलिस ताब्यात देण्यापूर्वी 'आमच्या ताब्यात द्या' असा अल्टिमेटम देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली आणि पुणे-सातारा महामार्ग सुमारे दोन तास रोखला.

नसरापूर (ता. भोर) - भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निरागस बालिकेवर ६० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केला. संतापलेल्या ग्रामस्थांनी आरोपीला पोलिस ताब्यात देण्यापूर्वी 'आमच्या ताब्यात द्या' असा अल्टिमेटम देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली आणि पुणे-सातारा महामार्ग सुमारे दोन तास रोखला. पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप गिल यांनी सांगीतले ही केस फास्ट ट्रॅक वर चालवता येईल, १५ दिवसांच्या आत आम्ही केसची चार्ज शीट करून लवकरात लवकर याचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घेत आहोत या कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच ग्रामस्थांनी महामार्ग मोकळा केला.

या दुर्दैवी घटनेत साडे तीन वर्षे बालिकेची हत्या भिमराव कांबळे (वय ६० वर्षे, रा. साळवडे, ता. भोर) या नराधमाने केली. ही बालिका तिच्या आजोळी आलेली असताना गुरांच्या गोठ्यात नेऊन त्याने तिचेवर लैंगिक अत्याचार करून तिला गोठ्यात हत्या केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ग्रामस्थांनी आरोपीला शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला. मात्र, पोलिसांनी बालिकेची शहानिशा करण्यासाठी तिला हलवताना ग्रामस्थांना कळवले नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी तीव्र आंदोलन सुरू केले आणि नंतर पुणे-सातारा महामार्गावर मोर्चा काढत दोन तास वाहतुक ठप्प केली.  रात्री साडे नऊ नंतर महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ग्रामस्थांनी 'नराधमास आमच्या ताब्यात द्या, कडक शिक्षा व्हावी' असा जाहीर घोषणाबाजी करत आंदोलन केले.या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत्या. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक गिल यांनी घटनास्थळी धावत येऊन संशयिताविरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात गुन्हा दाखल करून १५ दिवसांत कडक शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी महामार्ग मोकळा केला. ही घटना भोर तालुक्यातील समाजात संताप आणि भीती निर्माण करणारी आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, फास्ट ट्रॅक न्यायप्रक्रियेला गती देण्यात येईल अशी आशा आहे.

साडे तीन वर्षांच्या अशा पद्धतीने अत्याचार होणे, ही माणुसकीला काळीमा फासनारी घटना आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल . या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा कमी पडेल असे एका महिलेने आपले मत व्यक्त केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Minor Girl Raped, Murdered in Bhor; Villagers Demand Justice.

Web Summary : A three-and-a-half-year-old girl was raped and murdered in Nasrapur, Bhor. Villagers protested, blocking the Pune-Satara highway, demanding the accused be handed over. Police assured fast-track trial.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र