Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI

इथं एक नजर टाकुयात कसं आहे MI आणि CSK यांच्यासाठी प्लेऑफ्सच समीकरण? 

By सुशांत जाधव | Updated: May 2, 2026 10:25 IST

Open in App

MI And CSK IPL Playoffs Qualification Scenarios : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शनिवारी यंदाच्या हंगामातील ४४ वा सामना खेळवण्यात येणार आहे. चेपॉकच्या मैदानातील या लढतीआदी दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडच्या मैदानात भिडल्याचे पाहायला मिळाले. यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली होती. आता या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासोबतच मुंबई इंडियन्ससमोर प्लेऑफ्सच्या शर्यतीत स्वबळावर टिकून राहण्याचं मोठं आव्हान आहे. इथं एक नजर टाकुयात कसं आहे MI आणि CSK यांच्यासाठी प्लेऑफ्सच समीकरण? 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मुंबई इंडियन्सपेक्षा चेन्नई भारी, कारण....

यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी ८-८ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२६ स्पर्धेत १३ वर्षांनी  विजयी सलामी देणाऱ्या मुंबई इंडियन्सने ८ सामन्यानंतर फक्त २ विजयासह ४ गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे एवढ्याच सामन्यानंतर ६ गुणांसह चेन्नई सुपर किंग्स एक पाऊल पुढे असल्याचे दिसते.

PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरलMI साठी प्रत्येक सामना महत्त्वाचा, पहिलं टार्गेट CSK 

मुंबई इंडियन्सच्या संघाला ८ सामन्यातील ६ पराभवानंतरही प्लेऑफ्समध्ये स्वबळावर टिकून राहण्याची अखेरची संधी आहे. आतापर्यंत त्यांनी २ विजयासह ४ गुण कमावले असून -०.७८४ नेट रनरेटसह MI चा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. चेपॉकवरील लढाई ही फक्त बदला घेण्यापुरती मर्यादीत नसेल तर प्रतिष्ठा जपण्यासाठीही त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. त्यामुळे "पुढचं पुढं बघू आधी CSK चा बदला घेत चेपॉकवरील लढाई जिंकू,"  याच इराद्याने  MI चा संघ मैदानात उतरेल. 

मुंबई इंडियन्ससाठी प्रत्येक सामन्यात तगडे चॅलेंज

  • चेन्नई सुपर किंग्स ४४ वा सामना- २ मे, २०२६
  • लखनऊ सुपर जायंट्स ४७ वा सामना - ४ मे, २०२६
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  ५४ वा सामना- १० मे, २०२६
  • पंजाब किंग्स ५८ वा सामना- १४ मे, २०२६
  • कोलकाता नाईट रायडर्स  ६५ वा सामना -२० मे, २०२६
  • राजस्थान रॉयल्स ६९ वा सामना – २४ मे, २०२६

CSK साठी कसे आहे प्लेऑफ्सचं समीकरण?

चेन्नई सुपर किंग्सचा संघ ८ सामन्यात ३ विजय आणि ५ पराभवासह ६ गुणांची कमाई करत -०.१२१  नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. उर्वरित सर्व सामने जिंकून हा संघ १८ गुणांपर्यंत पोहचू शकतो. एखादा सामना गमावला तरी १६ गुणांपर्यंत पोहचून त्यांना प्लेऑफ्सचा डाव साधता येईल. पण दोन किंवा अधिक सामन्यातील पराभवासह त्यांच्यावर स्पर्धेबाहेर होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे तेही मुंबई इंडियन्सच विरुद्ध जोर लावताना दिसतील.

चेन्नई सुपर किंग्स उर्वरित लढती कुणाविरुद्ध खेळणार?

  • मुंबई इंडियन्स  ४४ वा सामना- २ मे, २०२६
  • दिल्ली कॅपिटल्स  ४८ वा सामना- ५ मे, २०२६
  • लखनऊ सुपर जायंट्स ५३ वा सामना- १० मे, २०२६
  • लखनऊ सुपर जायंट्स  ५९ वा सामना- १५ मे, २०२६
  • सनरायझर्स हैदराबाद ६३ वा सामना- १८ मे, २०२६
  • गुजरात टायटन्स ६६ वा सामना- २१ मे, २०२६ 
English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Playoffs: MI eyes revenge against CSK for survival.

Web Summary : MI faces CSK in a crucial IPL clash, seeking revenge and playoff contention. After a previous loss, MI needs a win to stay in the race. CSK also aims for a win to boost their playoff chances. Both teams face tough remaining schedules.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४हार्दिक पांड्याऋतुराज गायकवाडसंजू सॅमसन