Join us
Daily Top 2Weekly Top 5

Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:44 IST

उपचारादरम्यान जे. जे. रुग्णालयात या चौघांचाही मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांनी कलिंगड खाल्ल्यानंतरच त्रास सुरू झाल्याचा दावा केला होता, त्यामुळे राज्यात कलिंगड खाण्याबाबत भीतीचे वातावरण पसरले होते.

पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या मृत्यूस कलिंगडातील विषबाधा कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) प्रयोगशाळेतील अहवालाने आता या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. जप्त केलेल्या कलिंगडाच्या नमुन्यात कोणतीही भेसळ किंवा घातक रंग आढळले नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू

गेल्या शनिवारी (२५ एप्रिल) रात्री पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाने रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही तासांतच पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. उपचारादरम्यान जे. जे. रुग्णालयात या चौघांचाही मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांनी कलिंगड खाल्ल्यानंतरच त्रास सुरू झाल्याचा दावा केला होता, त्यामुळे राज्यात कलिंगड खाण्याबाबत भीतीचे वातावरण पसरले होते.

FDA अहवालात काय म्हटले आहे?

घटनेनंतर एफडीएने मृतांच्या घरातून कलिंगडाचे तुकडे, बिर्याणी आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने गोळा केले होते. 

कलिंगडात कृत्रिम गोडवा किंवा घातक रंगआढळले नाहीत.

नमुन्यांमध्ये कोणताही भेसळयुक्त घटक सापडलेला नाही.

इतर अन्नपदार्थही मानकानुसार असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

मृत्यूचे गूढ अजूनही कायम

कलिंगडात भेसळ नसल्याचे सिद्ध झाले असले तरी, या कुटुंबाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, हा मृत्यू अन्नातील एखाद्या विशिष्ट 'बॅक्टेरिया'मुळे किंवा इतर कोणत्याही विषारी घटकामुळे असू शकतो. आता सर्वांचे लक्ष कलिना येथील फॉरेन्सिक लॅबच्या व्हिसेरा अहवालाकडे लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Watermelon Deaths: No Poison Found, Mystery Remains Unsolved

Web Summary : FDA report clears watermelon in Mumbai family's death; no toxins detected. The family of four died after consuming watermelon. The cause of death remains unknown, pending further forensic analysis. Initial suspicion of food poisoning is now under review.