शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 08:28 IST

या विधानांनंतर मेलोनींची लोकप्रियता पुन्हा झपाट्यानं वाढत असून त्यांच्या कट्टर विरोधकांनाही राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर सरकारच्या समर्थनात उभं राहावं लागलं आहे.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी कुठल्या ना कुठल्या कारणानं कायम चर्चेत असतात. सध्या त्या वेगळ्याच कारणानं चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर नुकतीच टीका केली. दुसरीकडे रशियानंही त्यांच्यावर अपमानास्पद ताशेरे ओढले, पण त्याचा तोटा होण्याऐवजी मेलोनी यांना फायदाच झाला! ‘मजबूत आणि धडाडीच्या नेत्या’ म्हणून इटलीमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये वाढ झाली. इतकंच काय, त्यांच्या विरोधकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी असलेली दिसते आहे. 

मेलोनी यांच्यावर झालेल्या टीकेमुळे त्यांची देशांतर्गत आणि अंतरराष्ट्रीय प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे. त्यांचे राजकीय विरोधकही त्यांच्या समर्थनार्थ मैदानात आले आहेत. ट्रम्प यांच्याशी संघर्ष हा या बदलाची सुरुवात ठरला. ट्रम्प यांनी पोपबाबत केलेल्या त्यांच्या विधानाचा विरोध केल्याबद्दल मेलोनींच्या वक्तव्यांना त्यांनी ‘अस्वीकारार्ह’ म्हटलं. इराणकडे अण्वस्त्र असल्याचं सांगतानाच संधी मिळाल्यास तो दोन मिनिटांत इटलीचा नाश करू शकतो असंही म्हटलं.

यावर उत्तर देताना मेलोनी म्हणाल्या, त्यांचं सरकार कोणत्याही बाह्य दबावाखाली काम करत नाही, ना त्यांचा कोणी मालक आहे आणि ना आदेश देणारा कोणी!..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन माध्यमांच्या तीव्र टिप्पण्यांमुळे इटलीच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. अमेरिका आणि रशियाचे हे शाब्दिक हल्ले पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (४९) यांच्यासाठी नुकसानकारक ठरण्याऐवजी त्यांच्या संरक्षणार्थ ढालीसारखे ठरले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये असा संदेश गेला की त्यांचं सरकार परदेशी दबावासमोर झुकत नाही. या विधानांनंतर मेलोनींची लोकप्रियता पुन्हा झपाट्यानं वाढत असून त्यांच्या कट्टर विरोधकांनाही राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर सरकारच्या समर्थनात उभं राहावं लागलं आहे.

दुसऱ्या बाजूला, रशियन टीव्ही विश्लेषक व्लादिमीर सोलोव्योव्ह यांनी अपमानास्पद टिप्पणी करत मेलोनी यांना युक्रेन समर्थक असल्याचं आणि ट्रम्पपासून अंतर ठेवणं म्हणजे विश्वासघात असल्याचं म्हटलं. या विधानानंतर इटली सरकारनं रशियन राजदूतांना बोलावून निषेध नोंदवला. विशेष म्हणजे राजकीय मतभेद असूनही राष्ट्राध्यक्ष सर्जियो मत्तारेला आणि विरोधी पक्षनेत्या एली श्लाइन यांनीही सरकारच्या समर्थनात भूमिका घेतली. यामुळे देशांतर्गत राजकारणात एकजुटीचा संदेश गेला. त्यांनी इस्रायलसोबतच्या संरक्षण कराराच्या स्वयंचलित नूतनीकरणाला थांबवण्याचा निर्णय घेतला आणि जिथे मतभेद असतील तिथे त्यानुसार पावलं उचलली जातील असं स्पष्ट केलं. हा दृष्टिकोन देशांतर्गत पातळीवर अतिशय प्रभावी ठरला. आधी ट्रम्प यांच्याशी जवळीक असल्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती, मात्र आता त्या दबावाखाली झुकत नाहीत अशी धारणा निर्माण झाली आहे. जनमत चाचण्यांमध्ये घट झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता पुन्हा जुन्या पातळीच्या जवळ पोहोचताना दिसत आहे. 

यानिमित्तानं मेलोनी यांच्या बालपणीच्या घटनाही व्हायरल होत आहेत. १९९२ मध्ये इटलीमध्ये माफियांकडून न्यायाधीश बोर्सेलिनो यांची हत्या झाली होती. या घटनेनं त्यावेळी १५ वर्षांच्या मेलोनींचा प्रचंड संताप झाला होता. त्याच रागातून त्या थेट यूथ फ्रंटच्या कार्यालयात गेल्या आणि राजकारणात प्रवेश केला. याशिवाय मायकेल जॅक्सनच्या गाण्यांमधून त्या इंग्रजी भाषा शिकल्या. तणावाच्या काळात मुलीसोबत नृत्य करणं आणि २७ वर्षांपासून तोच फोन नंबर ठेवणं या गोष्टींनीही लोकांना प्रभावित केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's criticism boosts Meloni: Italian PM gains popularity despite controversy.

Web Summary : Trump's criticism and Russian disapproval backfired, boosting Italian PM Meloni's popularity. Her strong stance against external pressure resonated with Italians, uniting even political rivals. Personal stories further endeared her to the public.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पItalyइटली