शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:48 IST

पालघरमध्ये घडलेल्या विचित्र घटनेता दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Palghar Accident: पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नानिवली गावात १ मे रोजी पहाटे एक अत्यंत विचित्र आणि तितकीच हृदयद्रावक घटना घडली. लग्नावरून परतताना झालेल्या एका रस्ता अपघाताने दोन जीव घेतले. एका भीषण अपघातात मेहुण्याचा मृत्यू झाला, तर तो धक्का सहन न झाल्याने जखमी भावोजीनेही जवळच्याच झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय वैभव संजय लहांगे आणि त्याचा २२ वर्षीय भावोजी नितीन काशिनाथ वरठा हे दोघे नानिवली येथे एका लग्नासाठी गेले होते. शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास लग्न आटोपून हे दोघे दुचाकीवरून घरी परतत होते. दुचाकी वैभव चालवत होता. नानिवली बस स्टॉपजवळ आली असता, दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने वैभवचे नियंत्रण सुटले.

रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सोलर लाईटच्या खांबाला दुचाकीने जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती थेट एका झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे वैभवचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा हा सर्व थरार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

जखमी भावोजीने उचलले टोकाचे पाऊल

दुचाकीच्या मागे बसलेला नितीन वरठा हा या अपघातात जखमी झाला होता. मात्र, शुद्धीवर आल्यावर जेव्हा त्याने वैभव रक्ताच्या थारोळ्यात पडला असून त्याचा मृत्यू झालाय हे पाहिलं, तेव्हा नितीनला प्रचंड मानसिक धक्का बसला. जखमी अवस्थेतच त्याने शेजारच्या वाडीत धाव घेतली आणि आपल्याच पँटच्या साहाय्याने झाडाला लटकून आत्महत्या केली.

एकाच वेळी दोन मृत्यूंनी गाव हादरलं

सकाळी जेव्हा ग्रामस्थांनी एका बाजूला अपघातातील मृतदेह आणि दुसरीकडे झाडाला लटकलेला मृतदेह पाहिला, तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला हा प्रकार काय आहे हे कोणालाच उमजले नाही, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणि घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.

नितीनच्या पश्चात त्याची पत्नी आणि केवळ दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे लहांगे आणि वरठा या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पालघर जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरू आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मनोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अपघाताच्या वेळी वेगाची मर्यादा किती होती आणि अन्य काही तांत्रिक बिघाड होता का, याचीही तपासणी केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Palghar: Accident claims brother-in-law, grief-stricken brother dies by suicide.

Web Summary : In Palghar, a tragic accident killed a teenager. Overwhelmed by grief, his brother-in-law committed suicide at the same spot. Police are investigating.
टॅग्स :palgharपालघरAccidentअपघातDeathमृत्यू