काही दिवसांपूर्वीच 'आम आदमी पार्टी'ला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले राज्यसभा खासदार संदीप पाठक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पंजाबपोलिसांनी त्यांच्याविरोधात दोन गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पंजाबपोलिसांचे एक पथक दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले असता, पाठक मागच्या दारातून पळून गेल्याचे वृत्त असून, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आप'आपली तत्त्वे आणि मूल्ये विसरल्याचा आरोप करत २४ एप्रिल रोजी १० राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडला होता. यात संदीप पाठक, राघव चड्ढा आणि स्वाती मालीवाल यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होता. या बंडाच्या काही दिवसांतच संदीप पाठक यांच्यावर झालेली ही पोलीस कारवाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
आपल्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना राज्यसभा खासदार संदीप पाठक म्हणाले की, त्यांच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. "मी माझे संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणाने आणि सचोटीने देशाची सेवा केली आहे. देश कोणत्याही पक्षापेक्षा मोठा आहे. मी कधीही देशाशी गद्दारी करणार नाही, आणि कोणालाही करू देणार नाही. माझ्यासारख्या व्यक्तीवर जर कोणती कारवाई झाली असेल, तर यावरून ते किती घाबरले आहेत हे दिसून येते. मला यापेक्षा जास्त काही बोलायचे नाही, असेही खासदार पाठक म्हणाले.
खासदार संदीप पाठक यांनी काही दिवसापूर्वीच आम आदमी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. २४ एप्रिल रोजी, संदीप पाठक, राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रमजीत साहनी आणि स्वाती मालीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीच्या १० राज्यसभा खासदारांनी, अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आपली तत्त्वे, मूल्ये आणि मूळ आदर्शांपासून भरकटला असल्याचा आरोप करत पक्ष सोडला. या सात खासदारांपैकी सहा पंजाबचे आहेत.
Web Summary : Facing arrest, ex-AAP MP Sandeep Pathak, now with BJP, reportedly fled his Delhi residence as Punjab Police arrived with warrants related to serious charges. He denies knowledge of the FIR.
Web Summary : गिरफ्तारी से बचने के लिए, पूर्व आप सांसद संदीप पाठक, जो अब भाजपा में हैं, कथित तौर पर पंजाब पुलिस के गंभीर आरोपों से संबंधित वारंट के साथ पहुंचने पर अपने दिल्ली आवास से भाग गए। उन्होंने एफआईआर की जानकारी से इनकार किया।