शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:15 IST

West Bengal Re-polling 2026 : ...यानंतर, आयोगाने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार आज येथे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र यातच जिल्ह्यातील फाल्टा परिसरातून तणावाच्या बातम्या येत आहेत. येथील स्थानिक रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर धमक्या देत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

TMC vs BJP Bengal elections : पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांसाठी २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी, अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानावेळी काही तक्रारी आणि अनियमितता आढळून आली. यानंतर, आयोगाने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार आज येथे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र यातच जिल्ह्यातील फाल्टा परिसरातून तणावाच्या बातम्या येत आहेत. येथील स्थानिक रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर धमक्या देत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान येथे स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलांमध्ये तीव्र वादावादी झाली. स्थानिक रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर धमकावल्याचे गंभीर आरोप केले. बराच वेळ चाललेल्या या गदारोळानंतर सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे. ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष असेल.

१५ केंद्रांवर पुनर्मतदान -पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरून अनियमिततेच्या काही तक्रारी आल्या होता. यानंतर फाल्टा भागात ईव्हीएम मशीनवरील भाजपच्या पर्यायासमोर टेप लावण्यात आल्याची तक्रार भाजपने केला होती. निवडणूक आयोगाने याची दखल घेत अशा जिल्ह्यातील एकूण १५ मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाचे आदेश दिले होते. यात मगराहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ११ आणि डायमंड हार्बरमधील ४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. 

केंद्रीय सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात -सकाळी ७ वाजता सुरू झाले. ११ वाजेपर्यंत साधारण ३७ टक्के मतदान नोंदवले गेले. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मतदारसंघांत सध्या मतदान शांततेत सुरू आहे. कोणतीही मोठी हिंसक घटना समोर आलेली नाही. केंद्रीय सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. वेबकास्टिंगच्या माध्यमातून सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.

या पुनर्मतदानामध्ये मगराहाट पश्चिममधून टीएमसीचे मोहम्मद समीम अहमद मोल्ला आणि भाजपचे गौर सुंदर घोष यांच्यात मुख्य लढत आहे. तर डायमंड हार्बरमध्ये टीएमसीचे पन्ना लाल हलदर आणि भाजपचे दीपक कुमार हलदर यांच्यात मुख्य लढत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal: Ruckus during repoll; TMC-BJP workers clash!

Web Summary : Repolling in Bengal's South 24 Parganas saw clashes between TMC and BJP workers. Allegations of intimidation surfaced. Security forces intervened; tensions remain. Counting on May 4th.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस