शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:31 IST

Pune crime : १९९८ मध्ये भोर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि घरात घुसखोरीसंदर्भातही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

 पुणे : नसरापूर (ता. भोर) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा साळवडे गावचा रहिवासी असलेल्या कांबळेला त्याच्या संशयास्पद वर्तन आणि गुन्हेगारी इतिहासामुळे गावातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.कांबळे हा नसरापूर परिसरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. बांधकामे, शेतीकामे तसेच इतर किरकोळ कामांसाठी तो परिसरात फिरत असे. त्यामुळे स्थानिक भागात त्याची ओळख होती. शुक्रवारी दुपारनंतर तो नसरापूर येथील राममंदिर परिसरात सुरू असलेल्या कळसाच्या कामाजवळ दिसल्याची माहिती समोर आली आहे.स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी सध्या केळवडे रस्त्यालगत असलेल्या बुवासाहेब मंदिर परिसरात राहत होता. याआधीही त्याचा परिसरात मुक्त वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिस तपासात आरोपीविरोधातील जुने गुन्हेही समोर आले आहेत. राजगड पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच १९९८ मध्ये भोर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि घरात घुसखोरीसंदर्भातही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांतून तो जामिनावर बाहेर असल्याचे समजते.तपास अधिक गतीने सुरू असून आरोपीला अटक केल्यानंतर शनिवारी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने आरोपीला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात महिलांच्या लैंगिक छळासंबंधी आणखी काही तक्रारींची पडताळणी सुरू असून एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Nasrapur Accused, Ousted from Village, Had Prior Offenses

Web Summary : Bhimrao Kamble, arrested in the Nasrapur murder case, was previously expelled from his village due to suspicious behavior. He has a history of crimes, including a 2015 POCSO case and a 1998 molestation charge. He's now in police custody until May 7th.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या