नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कडकडडूमा न्यायालयात जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय न्यायाधीशांनी आत्महत्या केली आहे. अमन कुमार शर्मा असे या मृत न्यायाधीशांचे नाव असून, या घटनेमुळे दिल्लीच्या न्यायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सफदरजंग एन्क्लेव्ह पोलीस ठाण्याला शनिवारी दुपारी या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन कुमार शर्मा यांचा मृतदेह ग्रीन पार्क येथील त्यांच्या राहत्या घराच्या बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मेहुण्याने दिली माहिती...या दुर्दैवी घटनेची माहिती मृत अमन यांचे मेहुणे शिवम यांनी पोलिसांना दिली. प्राथमिक तपासात पोलिसांनी कोणत्याही बाह्य हस्तक्षेप किंवा घातपाताचा संशय व्यक्त केलेला नाही. मात्र, इतक्या कमी वयात एका जबाबदार पदावर असलेल्या न्यायाधीशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सध्या त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत.
न्यायिक कारकीर्द आणि पार्श्वभूमीअमन कुमार शर्मा यांनी २०१८ मध्ये पुणे येथील नामांकित सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. १९ जून २०२१ रोजी ते दिल्ली न्यायिक सेवेत रुजू झाले. आपल्या अल्प कारकीर्दीत त्यांनी अनेक दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑक्टोबर २०२५ पासून ते कडकडडूमा न्यायालयात उत्तर-पूर्व जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाचे पूर्णवेळ सचिव म्हणून कार्यरत होते.
या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण न्यायव्यवस्थेवर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
Web Summary : Delhi: A 30-year-old judge, Aman Kumar Sharma, was found dead in his Green Park residence. Initial reports suggest suicide by hanging. He was a secretary at Karkardooma Court and a Symbiosis, Pune alumnus. Police are investigating the cause of death.
Web Summary : दिल्ली: कड़कड़डूमा कोर्ट के सचिव, 30 वर्षीय अमन कुमार शर्मा, ग्रीन पार्क स्थित आवास में मृत पाए गए। प्रारंभिक रिपोर्ट आत्महत्या का संकेत देती है। वह सिम्बायोसिस, पुणे के पूर्व छात्र थे। पुलिस जांच कर रही है।