पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पक्षाच्या काऊंटींग एजंटना "ज्या बूथवर भाजपा ५०० ते ७०० मतांच्या फरकाने पुढे असेल, तिथे तातडीने पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करावी" असे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सर्व २९४ विधानसभा मतदारसंघांतील पक्षाचे नेते आणि काऊंटींग एजंटसोबत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीत हे निर्देश दिले. त्यांनी काऊंटींग एजंटना असा सल्ला दिला की, त्यांनी रविवारी रात्री मतमोजणी केंद्रांच्या जवळच मुक्काम करावा, जेणेकरून सोमवारी ते वेळेवर तिथे पोहोचू शकतील. दीड तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी समन्वय आणि सतर्कतेच्या आवश्यकतेवर भर दिला.
मतमोजणी केंद्रांवर वेळेपूर्वी पोहोचण्याच्या सूचना
'आयएएनएस'च्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रांवर वेळेआधी पोहोचण्यास आणि एकजुटीने काम करण्यास सांगितलं. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या बाबींची माहितीही त्यांनी यावेळी दिली. टीएमसी सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी दरम्यान देखरेखीवर विशेष जोर दिला आहे. त्यांनी सांगितलं की, ज्या बूथवर भाजपा ५००-७०० मतांपासून ते १००० मतांच्या फरकाने पुढे असेल, तिथे तातडीने पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली जावी.
धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
२०० पेक्षा जास्त जागा जिंकणार - ममता
तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांचा पक्ष २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल. मात्र, त्याच वेळी त्यांनी सावध केलं की मतमोजणी दरम्यान सतर्कतेमध्ये कोणतीही शिथिलता येता कामा नये. त्यांनी असे निर्देश दिले की, ४ मे रोजी जोपर्यंत त्या स्वतः माध्यमांशी संवाद साधत नाहीत, तोपर्यंत पक्षाच्या कोणत्याही काऊंटींग एजंटने मतमोजणी केंद्र सोडू नये. ज्या मतदारसंघांमध्ये मतमोजणी केंद्रे ग्रामीण किंवा दुर्गम भागात आहेत, तिथे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी रविवारीच पोहोचून तिथे राहावे, असा सल्ला त्यांनी दिला.
"TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसतशी प्रत्येक नोंद करण्यासाठी काऊंटींग एजंटने सोबत वही आणि पेन ठेवावे, असंही त्यांनी सांगितलं. सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम मेदिनीपूर आणि बांकुरा येथील पक्षाच्या अनेक उमेदवारांनी रविवारी रात्री मतमोजणी केंद्रांजवळ राहण्याची व्यवस्था आधीच केली आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी असा आरोप केला की, ज्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला पुढे दाखवलं जात आहे, त्यांचा उद्देश केवळ शेअर बाजारावर प्रभाव टाकणं हा आहे.
Web Summary : Mamata Banerjee instructed party agents to demand recounts in booths where BJP leads by 500-700 votes. She urged vigilance, advising agents to stay near counting centers and meticulously record results. Banerjee expressed confidence in winning over 200 seats while stressing continued alertness during vote counting.
Web Summary : ममता बनर्जी ने पार्टी कार्यकर्ताओं को निर्देश दिया कि भाजपा 500-700 वोटों से आगे होने पर पुनर्मतगणना की मांग करें। उन्होंने सतर्क रहने, मतगणना केंद्रों के पास रहने और परिणामों को ध्यान से रिकॉर्ड करने की सलाह दी। बनर्जी ने 200 से अधिक सीटें जीतने का विश्वास जताया और मतगणना के दौरान सतर्कता बनाए रखने पर जोर दिया।