शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 08:48 IST

Sunetra Pawar On Nasrapur Case: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले. या घटनेवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलादी हातांनी कारवाई झाली पाहिजे आणि हीच समाजाची अपेक्षा आहे. याप्रकरणातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा अर्थात मृत्युदंड मिळावा, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्या म्हणाल्या.

सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्या भावूक झाल्या. "ही घटना अत्यंत वेदनादायी, मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. आज कुटुंबाचे दुःख पाहून ही वेदना शब्दांत मांडणे अशक्य आहे. एक आई म्हणून त्या पीडित कुटुंबाची, विशेषतः त्या आईची अवस्था मी मनापासून जाणू शकते." त्यापुढे म्हणाल्या की, या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा शासनाचा ठाम आग्रह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणातील गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली आहे. एक आई आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही" या प्रकरणाबाबत सुनेत्रा पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याला याआधीही दोन वेळा अटक होऊन देखील जामिनावर सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्याने आणि आरोपीला मृत्युदंडाची मागणी केल्याने, या खटल्याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nasrapur Case: Sunetra Pawar demands strictest punishment for heinous crime.

Web Summary : Deputy Chief Minister Sunetra Pawar expressed outrage over the Nasrapur incident, demanding the harshest punishment for the perpetrator. She visited the victim's family, assuring them of justice and a fast-track trial, advocating for the death penalty. The government is committed to pursuing justice.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण