शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 09:46 IST

"राजकारण होत राहिल, पण मी हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती करते..."; सुप्रिया सुळेंनी काय केली मागणी?

Nasrapur Case Supriya Sule | पुण्यातील नसरापूर येथे एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून खून केला. क्रूरतेचा कळस म्हणजे दगडाने ठेचलेला मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याची धक्कादायक घटना नसरापूर (ता. भोर) परिसरात उघडकीस आली असून, पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ७ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून एक विनंती केली.

सुप्रिया सुळे नसरापूर घटनेवर काय म्हणाल्या?

"घडलेली घटना दुर्दैवी आहे, एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा करत होतो आणि ही बातमी आली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे आणि या आरोपीला लवकरात लवकर फासावर चढवले पाहिजे. नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. राजकारण होत राहील होत राहिल. पण माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की, नसरापूरला जी पोलीस चौकी आहे त्यात अपेक्षित पोलिस यंत्रणा नाही. महिला पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे.

हा नराधमाचा तिसरा गुन्हा...

"महिला आयोगाला आज अध्यक्ष नाही. न्याय मागायला जायचं कुठे? यंत्रणेने तातडीने नराधमाला पकडले. यासाठी पोलिस यंत्रणेचे आभार मानते.  पण यात आम्ही समाधानी नाही. ज्या क्रूर पद्दतीने ही हत्या झाली, ते पाहता हे खूपच वाईट आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा या नराधमाचा तिसरा गुन्हा होता. हा जर तिसरा गुन्हा आहे तर पहिल्या दोन गुन्ह्यात त्या नराधमाला जामीन कसा मिळाला? आमच्या लेकीची हत्या होईपर्यंत महाराष्ट्र सरकार थांबले आहे का?" असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.

आम्हाला आश्वासन नको, कारवाई हवी आहे!

"आम्हाला आश्वासन नको, कारवाई हवी आहे. मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत, गृहमंत्री आहेत. लोकांना वर्दीची भीतीच राहिलेली नाही. विकृतीला का भिती राहिली नाही? जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोवर शांत बसणार नाही. या माणसाला गावातून हाकलून दिले होते. आमचं पहिलं प्राधान्य आहे की या नराधमाला फाशी झाली पाहिजे. पुन्हा अशी घटना महाराष्ट्रात होऊ नये. लोकांची नाराजी रास्त आहे, एन्काऊंटर करण्याची मागणी बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी आम्ही चर्चा करणार आहे. शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Supriya Sule questions how Nasrapur accused got bail twice before.

Web Summary : Supriya Sule demands justice in Nasrapur case, questioning how the accused, a repeat offender, received bail previously. She urged fast-track court and stricter policing, emphasizing public safety over politics, and demanded swift action, not just assurances, from the government.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याSupriya Suleसुप्रिया सुळेSexual abuseलैंगिक शोषणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस