शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 09:50 IST

Delhi Residential Building Fire: दिल्लीतील विवेक विहार भागात एका रहिवासी इमारतीत मध्यरात्री एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीररित्या भाजले आहेत.

दिल्लीतील विवेक विहार भागात एका रहिवासी इमारतीत मध्यरात्री एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीररित्या भाजले आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली असून घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये मध्यरात्री एसीचा स्फोट झाल्याने आग लागली. आगीच्या ज्वाळा तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचताच, फ्लॅटमधील रहिवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टेरेसच्या दिशेने धाव घेतली. परंतु, टेरेसचा दरवाजा आतून बंद असल्याने अनेकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावर उपस्थित असलेल्या चार व्यक्तींचाही या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला. तर, एका पलंगावर तीन मृतदेह आढळून आले.  या दुर्घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन नियंत्रण कक्षाला पहाटे ३:४७ च्या सुमारास सूचना मिळाली. त्यानंतर अग्निशमनदलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ४ जण गंभीररित्या भाजले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Fire: AC Blast Kills Nine in Tragic Blaze

Web Summary : A midnight AC explosion in Delhi's Vivek Vihar caused a devastating fire, killing nine and seriously injuring several others. The fire trapped residents, with many deaths occurring on the terrace. Cooling operations are underway as police investigate.
टॅग्स :fireआगdelhiदिल्ली