शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 11:26 IST

Aman Kumar Sharma : दिल्लीमध्ये एका न्यायाधीशाने घराच्या बाथरूममध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दिल्लीमध्ये एका न्यायाधीशाने घराच्या बाथरूममध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमन कुमार शर्मा असं या न्यायाधीशाचं नाव आहे. अमन हा मूळचा राजस्थानमधील अलवरचा रहिवासी होता आणि दिल्लीच्या DLSA मध्ये सचिव म्हणून कार्यरत होता. दिल्लीतील ग्रीन पार्क येथील निवासस्थानी आपल्या पत्नीसोबत राहत होता. आता या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमन याचा त्याच्या पत्नीशी वाद सुरू होता असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

न्यायाधीश अमन कुमार शर्माच्या एका नातेवाईकाने सांगितलं की, अमनन रात्री १० च्या सुमारास वडिलांना फोन करून म्हटलं होतं की, "पप्पा, मी खूप त्रस्त आहे, आता जगणं अवघड झालं आहे." मुलाच्या या फोननंतर वडील तातडीने अलवरवरून दिल्लीला पोहोचले. तिथे त्यांनी पाहिलं की मुलगा आणि सून यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू होतं. याच दरम्यान सून म्हणाली, "इथून निघून जा, नाहीतर मी पोलीस बोलावेन." सकाळी पुन्हा दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर अमनने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतलं. काही वेळाने गळफास घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन शर्मा ग्रीन पार्क मेन येथील यु-४ए च्या पहिल्या मजल्यावर राहत होता. शनिवारी दुपारी १:४५ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ही माहिती शिवम यांनी दिली, जे डिफेन्स कॉलनीचे रहिवासी आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मृताची पत्नी देखील न्यायिक अधिकारी असून तिचा जबाब नोंदवला जात आहे. अमन शर्माचा मोबाईल आणि कॉल डिटेल्सची तपासणी केली जात आहे.

पोलीस आता शेजारी आणि सहकाऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत, जेणेकरून त्यांना हे टोकाचं पाऊल उचलण्यास कोणत्या गोष्टीने भाग पाडलं हे स्पष्ट होऊ शकेल. अमन शर्माने २०१८ मध्ये पुण्याच्या एका विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि २०२१ मध्ये तो न्यायिक सेवेत रुजू झाला होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये कडकडडूमा कोर्टातील डीएलएसएचा सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. तरुण मुलाच्या निधनाने त्याचे वडील पूर्णपणे खचले आहेत. न्यायाधीशाच्या पत्नीची बहीण आयएएस अधिकारी असून सध्या जम्मूमध्ये तैनात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Judge ends life after fight; accuses wife in final call.

Web Summary : A Delhi judge, Aman Kumar Sharma, died by suicide after telling his father life was hard. He had argued with his wife, also a judicial officer. Police are investigating the circumstances.
टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस