शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 14:01 IST

सूरज पांडुरंग फाले या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला

म्हासुर्ली - कोनोली तर्फ असंडोलीपैकी फाल्याचा धनगरवाडा (ता. राधानगरी) येथे पूर्ववैमनस्यातून मानेवर धारदार हत्याराने खोलवर वार करून तसेच डोक्यात वर्मी घाव घालून सूरज पांडुरंग फाले (वय ३५. सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. तसेच त्याची पत्नी सोनिया पाटील (वय ३०) गंभीर जखमी झाली आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, यातील तीन आरोपी स्वताहून राधानगरी पोलिसांत हजर झाले आहेत.

मूळ फालेवाडा येथील रहिवासी असणारा सूरज हा शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पत्नीसह कोल्हापूरहून येथे आला होता. त्याचवेळी सध्या कोल्हापूर येथे राहणारे आरोपी आपल्या मूळ घरी आले होते. त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला आणि वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन घरासमोरील शेतात खुनाचा प्रकार घडला. यावेळी सूरज याची पत्नी वाद सोडविण्यासाठी गेली असता तिच्याही डोक्यात मार बसल्याने गंभीर जखमी झाली. यातील आरोपी धोंडीराम बापू फाले, दगड्डू बापू फाले, बाबू ज्ञानू फाले हे राधानगरी पोलिसांत हजर झाले आहेत. मात्र, गुन्ह्यातील आरोपींची संख्या किती होती हे अद्यापही अस्पष्ट आहे.

घटनास्थळावरील परिस्थिती एवढी विदारक होती की, मानेवर कोयत्याने खोलवर वार केल्याने रक्ताचे थारोळे साचले होते, तर डोक्यात वर्मी घाव बसल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी चार चारचाकीची तोडफोड करण्यात आली. या गाडीमध्ये एक बंदूक, तसेच दारूच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या. घटनास्थळी राधानगरी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth Brutally Murdered Over Old Feud; Wife Injured; Accused Surrender

Web Summary : A youth was brutally murdered in Radhanagari due to prior animosity. His wife was seriously injured. Three accused have surrendered to the police. The motive is unclear. The incident involved sharp weapons and a violent altercation.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू