शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 12:48 IST

Pune Crime - उन्हाळ्याच्या सुटीसाठी आई-वडिलांसोबत आजोळी आलेल्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगत गोठ्याकडे नेले.

पुणे / नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.उन्हाळ्याच्या सुटीसाठी आई-वडिलांसोबत आजोळी आलेल्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगत गोठ्याकडे नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर पुरावे लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह गोठ्यातील शेणात पुरल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भीमराव कांबळे (वय ६५, रा. साळवडे, ता. भोर) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमच्या घरी येऊ नये. या दरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पीडित कुटुंबाच्या या भूमिकेमुळे समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी कुटुंबाच्या भावनांना पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांकडून आरोपीस फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.नसरापूर अत्याचार प्रकरण घटनाक्रमशुक्रवार दु. ३ वा. पीडित चिमुकली शेवटची राम मंदिर भागात दिसली.दु. ३:४५ वा. मुलगी घरी न आल्याने आजीकडून मुलीचा शोध सुरू.दु. ४ वा. ग्रामस्थांकडून शोध सुरू.दुपारी ४:३० वा. सीसीटीव्ही शोधले तेव्हा आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला.संध्या. ५:३० वा. ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणला, चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवलेली जागा सांगितली. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.सायं. ६ वा. शेणाच्या ढिगाऱ्यातून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक.संध्या. ७ वा. ग्रामस्थांनी पोलिसांना जागेवरच घेराव घातला. वादानंतर पोलिसांनी मृतदेह हलवला.रात्री ८:०० वा. ग्रामस्थांचा राजगड पोलिस स्टेशनला घेराव.रात्री ९:०० वा. गावकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी झाली.रात्री ११ वा. एसपी गिल दाखल झाले. लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको मागे घेतला.शनिवार सकाळी ७:०० वा. नसरापुरात कडकडीत बंद. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nasrapur Case: No Politician Until Justice, Says Victim's Father

Web Summary : A three-year-old girl was brutally murdered after sexual assault in Nasrapur, Pune. The father demands justice and refuses politicians until the perpetrator is hanged. Villagers protested, demanding swift justice and a death sentence for the accused. Tensions remain high in the area.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र